Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सोशल मीडियावर फोटो, रील्स टाकण्यापूर्वी सावधान, 'या' चुका करू नका

सोशल मीडियावर फोटो, रील्स टाकण्यापूर्वी सावधान, 'या' चुका करू नका



सोशल मीडियावर बिनधास्तपणे फोटो, व्हिडिओ आणि रील्स शेअर करणाऱ्यांनो आत्ताच सावध व्हा. सायबर गुन्हेगार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तुमच्याशी संबंधित फोटो आणि व्हिडिओचा गैरवापर करू शकतात. सायबर सुरक्षा धोके वाढल्याने, सोशल मीडियावरची सावधगिरी महत्वाची बनली आहे. 2024 मध्ये सोशल मीडियावरच्या तक्रारींमध्ये ऑनलाइन धमक्या, बनावट प्रोफाइल तयार करून ब्लॅकमेलिंग करणे, चॅटिंगद्वारे फसवणूक आणि लग्नाच्या नावाखाली फसवणूक वाढली आहे.

 
सायबर गुन्हेगार एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून सेक्सटॉर्शन आणि डीपफेक (Deepfake) तयार करणे सोपे करत आहेत. महिलांबाबत अशा प्रकारच्या तक्रारी जास्त दिसत आहेत, ज्यामध्ये त्यांचा गैरवापर करत ताणतणाव निर्माण केला जात आहे. सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ किंवा रील्स पोस्ट करण्यापूर्वी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. अनोळखी व्हिडिओ कॉल्स स्वीकारू नका, अशा वेबसाइट्सवर जा ज्यांची यूआरएल लॉक केलेली नसेल, आणि अनोळखी लोकांशी सोशल मीडियावर मैत्री करण्यापासून टाळा. या सावधगिरी उपायांमुळे सायबर गुन्हेगारांचा शिकार होण्याची शक्यता कमी होईल. पोलिसांनी अशा प्रकरणांमध्ये कारवाई सुरू केली आहे, परंतु महिलांना स्वतःची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांना सोशल मीडियावर सुरक्षितता राखण्याबाबत अधिक जागरूक व्हायला हवे.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.