Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खाजगी शिक्षण संस्थेच्या शाळांना घरपट्टीतून मुक्तता मिळावी, रावसाहेब पाटील.

खाजगी शिक्षण संस्थेच्या शाळांना घरपट्टीतून मुक्तता मिळावी, रावसाहेब पाटील.
 

सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या पदाधिकारी यांची मीटिंग स्वदेशी विला येथे झाली. घरपट्टी संदर्भात सविस्तर चर्चा झाली. मंदिर व देवस्थान यांना घरपट्टी माफ आहे. शिक्षण संस्था ह्या विद्येचे मंदिरच आहे तसेच या संस्था धर्मादाय आयुक्त कडे चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून नोंद आहेत. सद्यस्थितीला वेतनेतर अनुदान मिळत नाही. आरटी प्रवेशाला प्रतिपूर्ती परतावा 25% ची रक्कम इंग्लिश मिडीयम शाळांना ४ ते ५ वर्षे मिळत नाही. शाळांना भाडे मिळत नाही. शिक्षण संस्था चालवणे अडचणीचे होत असताना शाळेंना महानगरपालिकेचा घरपट्टी कर भरणे अडचणीचे होत आहे.

ग्रामपंचायत क्षेत्रातील शाळेंना घरपट्टी आकारली जात नाही. त्या धरतीवर महानगरपालिका यांनीही शाळेंना घरपट्टी माफ करावी. आयुक्त यांच्या अधिकारात घरपट्टी माफ करता येते तर आयुक्त साहेब यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून घरपट्टी माफी करावी अशी मागणी करण्याचे ठरले.  यावेळी शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांना युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेकडून शिवजयंती निमित्त सांगली भूषण पुरस्कार दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आर एस चोपडे, विनोद पाटोळे, भारत दुधाळ, कपिल रजपूत, बाहुबली कबाडे, वैभव गुरव, एस के पाटील हे पदाधिकारी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.