सांगली : शासकीय कर्मचाऱ्यांना शारीरिक श्रमापेक्षा बौद्धिक श्रम जादा असते. त्यामुळे निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे मत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. दि सॅलरी अर्नर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीने आयोजित केलेल्या शासकीय कर्मचारी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की दैनंदिन कामकाज करताना कर्मचाऱ्यांना बौद्धिक ताण पडत असतो. त्यामानाने व्यायाम अपुरा पडत असल्याने अनेक आजार उद्भवू शकतो. म्हणून प्रत्येकाने नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.
चिंतामण महाविद्यालय व विलिंगडन महाविद्यालय मैदानावर दोन दिवस क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये क्रिकेट, कबड्डी, हॉलीबॉल, धावणे, पोहणे, रस्सीखेच अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या खेळाडूंना व संघांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. जिल्हा हिवंताप अधिकारी डॉ. प्रवीण पाटील यावेळी उपस्थित होते. सॅलरीचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर उपाध्यक्ष सुषमा जाधव यांनी आभार मानले. कार्यलक्षी संचालक नंदकुमार लोखंडे, संस्थेचे संचालक, मार्गदर्शक, सभासद कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.