सांगलीच्या पेठ नाका जवळील एका कारखान्याच्या गोडावूनला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही आग सकाळी सुमारे ६ वाजता लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ ते ७गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात
यश आले. आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे संपूर्ण परिसर प्रभावित झाला
होता. या आगीत परदेशात निर्यात होणारा माल आणि संपूर्ण गोडावून जळून खाक
झाले. प्राथमिक अंदाजानुसार, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले
जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.