Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खाली बसायचं! गजा मारणे पोलीस स्टेशनला हजर, पोलिसांनी भाईला बसवलं जमिनीवर!

खाली बसायचं! गजा मारणे पोलीस स्टेशनला हजर, पोलिसांनी भाईला बसवलं जमिनीवर!

पुणे :- भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीय देवेंद्र जोग यांना मारहाण प्रकरणाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. कुख्यात गुंड गजा मारणे हा पोलिसांसमोर हजर झाला आहे.


मारणे स्वत: कोथरूड पोलीस स्टेशनला हजर झाला आहे.

पुणे शहरातील कोथरूडमधील भेलकेनगर चौकात मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला गजा मारणेच्या गुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी अखेर पोलिसांनी गजा मारणेला सुद्धा अटक केली आहे. यापूर्वी तीन आरोपींना अटक केली होती. आणखी दोन आरोपी फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे.या प्रकरणात फरार असलेल्या गजा मारणेला आम्ही अटक केली. गजा मारणेची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर उद्या मंगळवारी कोर्टात हजर केलं जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील कोथरूड परिसरात शिवजयंतीच्या दिवशी मुरलीधर मोहोळ यांचे निकटवर्ती असलेले देवेंद्र जोग यांना मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणेला अटक केली आहे. या मारहाणीत तरुणाच्या नाकाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आलं होतं. ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (वय 35 शिंदे चाळ, संजय चौक, शास्त्रीनगर, कोथरूड), किरण कोंडिबा पडवळ ( वय 31 , शेख चाळ, शास्त्रीनगर, कोथरूड) आणि अमोल विनायक तापकीर (वय 35, रा. लालबहाद्दूर शास्त्री कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड) अशी त्यांची नावे आहेत. या मारहाण प्रकरणी केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेऊन पुणे पोलीस आयुक्ता यांच्यावरती नाराजी दर्शवत गंभीर टीका केली होती. त्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला. अखेरीस पंटरच्या पराक्रमामुळे गजाला पोलीस स्टेशनला हजर व्हावं लागलं, पोलिसांनी गजा मारणेला इतर गुन्हेगाराप्रमाणे फरशीवर खाली बसवलं. गुन्हे दाखल करण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांनी जोग मारहाण प्रकरणात गज्या मारणेसह टोळीवर मकोका दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. ही कारवाई मारणे टोळीसाठी मोठा धक्का समजला जात आहे. कारवाईमध्ये मारहाण करणाऱ्या तिघांवर मकोका लावण्यात आला आहे. या टोळीला नेस्तनाबूत करण्याची पोलिसांची भूमिका आहे. एकूण 27 आरोपी आमच्या रडारवर आहेत. टोळीप्रमुखावरही कारवाई केली जाईल. कोणीही कायदा हातात घेऊ नका. त्या टोळीतील सदस्यांच्या मालमत्तांची माहिती डीडीआरकडून आणि त्यांच्या वाहनांची माहिती आरटीओकडून मागवली आहे. हे सगळे आरोपी त्या दिवशी एक चित्रपट पाहायला गेले असल्याची सुद्धा माहिती पोलिसांनी सांगितली आहे.

आतापर्यंत किती गुन्हे दाखल?

गजा मारणे यांच्या विरोधात खून खुनाचा प्रयत्न खंडणी असे तब्बल 28 गुन्हे दाखल

गजा मारणे विरोधात पुणे पोलिसांकडून 2014 पासून चौथा मकोका

अमोल शिंदे , पप्पू गावडे खून प्रकरणात 2014 साली दोन मकोका

वकीलाकडून खंडणी मागितल्याप्रकरणात 2022 साली मकोका

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.