Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बाळासाहेब थोरात, प्रा. सदानंद मोरे यांना गुलाबराव पाटील जीवन गौरव पुरस्कार तर डॉ. लताताई देशपांडे व आप्पासाहेब पाटील यांना गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार जाहीर.. रविवारी २ मार्चला भावे नाट्यमंदीरात डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान समारंभ...

बाळासाहेब थोरात, प्रा. सदानंद मोरे यांना गुलाबराव पाटील जीवन गौरव पुरस्कार तर डॉ. लताताई देशपांडे व आप्पासाहेब पाटील यांना  गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार जाहीर..  रविवारी २ मार्चला भावे नाट्यमंदीरात डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते  पुरस्कार प्रदान समारंभ...


सांगली दि. २८: गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट सांगली-मिरज यांचेवतीने प्रतीवर्षी दिले  जाणारे अत्यंत प्रतिष्ठेचे राज्यस्तरीय 'स्व. गुलाबराव पाटील जीवन गौरव पुरस्कार  अहमदनगर जिल्हा व संगमनेर तालुक्याचे विकासपुरुष व महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री, संगमनेर मतदार संघातून ८वेळा भरघोस मतांनी निवडून आलेले, ५ वेळा राज्याच्या कॅबिनेट मंत्रीमंडळात समावेश व महसूल, कृषी, राजशिष्टाचार व सामाजिक न्याय खात्याचे मंत्री म्हणून उठावदार कार्य केलेले काँग्रेस विधीमंडळ पक्ष नेते, प्रदेश काँग्रेस कमिटी, काँग्रेस वर्किंग कमिटी इ.च्या माध्यमातून पक्ष मजबूत करण्यासाठी सदैव कार्यरत, भाऊसाहेब थोरात सह. साखर कारखाना, अमृतवाहिनी शिक्षण संस्था, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात शिक्षण संस्था, राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी बँक इ. सहकारी संस्थेच्या माध्यमातून प्रचंड मोठे जनकल्याणकारी कार्य बाळासाहेब थोरात यांनी उभे केले आहे. 

पहिला गुलाबराव पाटील पुरस्कार संगमनेरच्या अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना प्रदान करण्यात आला होता. त्यांचे सुपुत्र माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण व कालव्याचे जाळे निर्माण करुन संगमनेर तालुका सुजलाम सुफलाम केला आहे. त्यांच्या परिश्रमाने  व थोरात कुटुंबाच्या जनसेवेतून निर्माण झालेल्या सहकारी संस्था या देशाला दिशादर्शक ठरतील अशी प्रगती करत आहेत. त्यांच्या सहकार, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीची नोंद घेऊन त्यांना सन २०२३ - २४ चा सहकारतीर्थ गुलाबराव पाटील जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. व सन २०२४-२५ चा  पुरस्कार लेखक, कवी, प्रवचनकार, संतसाहित्याचे संशोधक, प्रवचनकार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागाचे प्रमुख आणि संत तुकाराम महाराजांचे १३ वे थेट वंशज प्रा. सदानंद मोरे, पुणे यांना प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह आणि रक्कम रु. २५ हजार असे आहे. 

 

तसेच सन २०२३-२४ चा गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार  बालशिक्षण व बालसंस्कार या क्षेत्रात भरीव योगदान असलेल्या डॉ. लताताई देशपांडे व २०२४-२५ चा पुरस्कार सांगली व राजकीय, सामाजिक, धार्मिक, सहकार व शैक्षणिक आणि वृत्तपत्र क्षेत्रातील भरीव कामगिरी केलेले आप्पासाहेब पाटील - सांगली यांना प्रदान करण्यात येणार आहेत. लोकसाहित्य व लोकसंस्कृती, समीक्षण व मराठी साहित्य क्षेत्रात भरीव योगदान राहिलेल्या आणि ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते रविवार दि.२ मार्च रोजी स.१०.०० वा. सांगलीत भावे नाट्य मंदिरात माजी जलसंपदा मंत्री, आमदार जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत अशी माहिती गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले,  'महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी खासदार, सहकार चळवळीचे देशातील अग्रणी नेते स्व. गुलाबराव पाटील यांच्या स्मृतीपित्यर्थ प्रतीवर्षी आम्ही गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीने गेली दोन दशके सहकारतीर्थ गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार प्रदान करीत आलो आहोत. सामाजिक, राजकिय,शैक्षणिक, सहकार, कला, साहित्य आदि क्षेत्रातील उत्तुंग कामगिरी करणा-या व्यक्तींना गेली २० वर्षे हा पुरस्कार आमच्या ट्रस्टच्या वतीने सांगली येथे देण्यात येतो. सांगलीचे माजी नगराध्यक्ष स्व. डॉ. जी. ए. देशपांडे यांच्यापासून देशपांडे कुटुंबियांचे आम्हा पाटील कुटुंबियांशी घट्ट ऋणानुबंध आहेत.शिक्षण, संस्कार व बालकांचा सर्वांगीण विकास याबाबतीतील डॉ. लताताई देशपांडे यांच्या भरीव  योगदानाबद्दल  त्यांना व आमच्या कुटुंबियांशी घनिष्ठ ऋणानुबंध असलेले आणि राजकीय आणि वृत्तपत्र क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मा. आप्पासाहेब पाटील सांगली यांना गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.या पुरस्काराचे स्वरूप रक्कम रु. १५ हजार, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे.
नाटक, रंगभूमी, मराठी भाषा व साहित्य, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्रीमुक्ती चळवळ, लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती, साहित्य लेखन, समीक्षण इ. क्षेत्रात विपुल लेखन केलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष  प्रा. डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत आतापर्यंत गुलाबराव पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये स्व. भाऊसाहेब थोरात,स्व. विलासराव देशमुख, स्व. पतंगराव कदम, शिवाजीराव भोसले, दिनकर द. पाटील, शंकरराव काळे, भाऊसाहेब निंबाळकर, शिवाजीराव सावंत, सा. रे. पाटील, कल्लाप्पाण्णा आवाडे, डी. वाय. पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, डी. के. पाटील काका, सुशिलकुमार शिंदे, डॉ. शांत. ब. मुजुमदार व विद्याधर अनासकर तसेच गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार यापूर्वी बापूसाहेब ताटे, बाळासाहेब गुरव, शंकरराव तावदारे, बी. टी. भगत, शहाजीराव जगदाळे, प्रा. श. ठाकूर, जयराम देसाई, धोंडीसाहेब देशमुख, मोहन कदम, बाजीराव पाटील, बाळासाहेब आडमुठे, डॉ. एस. व्ही. सोरटूर, प्रा. शरद पाटील व रामभाऊ घोडके यांना प्रदान करण्यात आले आहेत. अशीही माहिती पृथ्वीराज यांनी दिली. यावेळी  कार्यकारी विश्वस्त प्रमिलादेवी पाटील, विश्वस्त शंकर तावदारे, डॉ. इक्बाल तांबोळी व अॅड. विरेंद्रसिंह पाटील, बिपीन कदम, प्रा. एन.डी.बिरनाळे, सनी धोतरे, रंगराव शिपुगडे, प्रशांत अहिवळे, महावीर पाटील  उपस्थित होते. या पुरस्कार वितरण सोहळ्यात  नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे  संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.