Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मध्यमवर्गीय, शेतकरी आणि उद्योजकांना दिलासा ,प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्पआमदार सुधीरदादा गाडगीळ यांची प्रतिक्रिया

मध्यमवर्गीय, शेतकरी आणि उद्योजकांना दिलासा , प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची प्रतिक्रिया
 

सांगली, दि. १:-  देशातील मध्यमवर्गीय ,शेतकरी, कामगार आणि उद्योग क्षेत्राला दिलासा देणारा प्रोत्साहन देणारा आणि गुंतवणुकीस चालना देणारा केंद्रीय अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी व्यक्त केली.  आमदार गाडगीळ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प देशाच्या आणि सर्व राज्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा असा आहे.  १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन एक मोठा दिलासा मध्यमवर्गाला त्यांनी दिला आहे. शेतकरी आणि शेती विकासासाठी विविध योजना जाहीर केल्यामुळे ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा आणि नागरिककेंद्रीत गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा हा अर्थसंकल्प आहे. मध्यमवर्गीय, पगारदार, युवक आणि शेतकरी तसेच कष्टकरी या सगळ्यांना केंद्रीय अर्थसंकल्पात दिलासा देण्यात आला आहे. या अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे जिल्हा आणि तालुका पातळीवरील उद्योग वाढीस प्रोत्साहन मिळणार आहे. कापूस ,कडधान्ये अशा सर्वच पिकांना  खूप मोठी चालना यानिमित्ताने मिळणार आहे . 

आमदार गाडगीळ म्हणाले,प्राप्तीकराची मर्यादा वाढविल्याने तो पैसा अर्थव्यवस्थेत येईल. त्यामुळे मागणी वाढेल. करपात्र उत्पन्नाची मर्यादा ७ वरून १२ लाख करणे हा निर्णय ऐतिहासिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच ही मर्यादा अडीच लाखांवरून सात लाख करण्यात आली होती. ती आता १२ लाख करण्यात आली. हा प्रवास निश्चितच भारतीय अर्थव्यवस्थेसाठी परिणामकारक आहे. यातून मध्यमवर्गीय, पगारदार, युवक यांना मोठा दिलासा मिळणार आहे. एका मोठ्या वर्गाच्या हाती उत्पन्नाचा मोठा वाटा राहणार आहे. ज्यामुळे बाजारपेठांत चैतन्य निर्माण होईल. खरेदी वाढेल, मागणी वाढेल, उत्पादन वाढेल, रोजगार वाढेल.यातून अर्थव्यवस्था आणखी बळकट होण्यास मदत होईल. ते म्हणाले, या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठींही महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. देशातील शंभर जिल्ह्यांसाठी विशेष प्रोत्साहन योजना, तेलबिया उत्पादनाला प्रोत्साहन, यात शंभर टक्के माल खरेदीचे धोरण यामुळे शेतकर्‍यांसाठी एक मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.  युवा उद्योजकांसाठी एमएसएमई क्षेत्र महत्वाचे आहे. त्यांच्यासाठी कर्ज मर्यादा आणि वारंवारतेचा निकष वाढविण्याच्या निर्णय महत्त्वपूर्ण आहे स्टार्टअप साठी २० कोटी रुपयांची कर्ज मर्यादा वाढवण्याचा निर्णय रोजगार वाढीला चालना देणार आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.