Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सलमान खान 'या' अभिनेत्रीसोबत अडकणार लग्नबंधनात?, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

सलमान खान 'या' अभिनेत्रीसोबत अडकणार लग्नबंधनात?, सोशल मीडियावर चर्चांना उधाण
 
 
बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल आणि सुपरस्टार सलमान खान  यांच्यातील लग्नाच्या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे. ट्विटरवरील #AskAmy या लाईव्ह चॅट दरम्यान चाहत्यांनी अमीषाला सलमानसोबत लग्नाचा प्रश्न विचारला.

 
यावर उत्तर देताना तिने गमतीशीर प्रतिक्रिया दिली. ट्विटरवरील एका चाहत्याने विचारले, 'सलमान आणि तू दोघेही सिंगल आहात, मग लग्न का करत नाही?' यावर अमीषाने हसत उत्तर दिले, 'हो, सलमान सिंगल आहे आणि मी देखील. मग काय तुम्हाला वाटतं की आम्ही लग्न करावं? पण कारण काय असावं - लग्नासाठी की एखाद्या चित्रपटाच्या प्रोजेक्टसाठी?'
तिने पुढे स्पष्ट केले की, खरं सांगायचं तर मी खूप दिवसांपासून लग्नासाठी तयार आहे, पण योग्य जोडीदारच मिळत नाही. अमीषा म्हणाली, 'लोकांना सुंदर कपल्स पाहायला आवडतात. 'कहो ना प्यार है'  नंतर लोकांना वाटलं होतं की मी आणि हृतिक रोशन खऱ्या आयुष्यातही एकत्र असावं. पण जेव्हा त्याने लग्नाची घोषणा केली, तेव्हा चाहत्यांना धक्का बसला होता.'

अमीषाने आणि सलमान खानने 'यें हैं जलवा'  
मध्ये एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष चालला नसला तरी चाहत्यांना त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री खूप आवडली होती. सलमान खान लवकरच 'सिकंदर'  या चित्रपटात झळकणार आहे, जो ईद 2025 ला प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे, अमीषा पटेल तिच्या आगामी 'रन भोला रन या चित्रपटात दिसणार आहे, जो यावर्षी प्रदर्शित होईल. अमीषा पटेल हिने 2000 साली 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'गदर: एक प्रेम कथा'  आणि 'हमराज' सारख्या हिट चित्रपटांमुळे ती चर्चेत राहिली. गेल्या वर्षी ती 'गदर 2' मध्ये सनी देओलसोबत झळकली होती.

सलमान खान आणि अमीषा पटेल यांच्या लग्नाच्या चर्चांना आता जोर आला आहे. मात्र, अमीषाने या अफवा फेटाळून लावल्या असून ती केवळ मजेशीरपणे चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देत होती. सलमान खानच्या वैवाहिक स्थितीबाबत नेहमीच उत्सुकता असते, मात्र आतापर्यंत त्याने कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिलेली नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.