Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जुना वाद उकरून काढला; तरुणास गरम रॉडचे चटके देऊन जीवघेण्या यातना

जुना वाद उकरून काढला; तरुणास गरम रॉडचे चटके देऊन जीवघेण्या यातना


 

भोकरदन (जालना) : भोकरदन तालुक्यातील जानेफळ गायकवाड येथे जुन्या वादाच्या कारणावरून कैलास गोविंदा बोराडे (33 रा. अनवा) या तरुणास गरम लोखंडी रॉडने अंगाला चटके देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात शिवसेना उबाठा गटाचे तालुका प्रमुख नवनाथ दौंड व त्यांचा भाऊ सोनू उर्फ भागवत सुदाम दौंड (रा. जानेफळ गायकवाड ता. भोकरदन) यांच्यावर पारध पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि 27) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसुन्न करणाऱ्या या प्रकरणामुळे भोकरदन तालुक्यात मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता होती का अशी चर्चा सुरू झाली आहे. कैलास बोराडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दौंड आणि त्यांचे शेत शेजारी आहे. त्यामुळे नवनाथ दौंड व त्यांच्यात पूर्वीपासून भांडण आहेत.

 
तेव्हापासून दौंड बंधू माझ्यावर खार खाऊन आहेत. बुधवारी मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर सोनू उर्फ भागवत दौंड याने तू माझ्या भावासोबत भांडण केले होते. तुला मस्ती आली आहे, असे म्हणून मारहाण केली. चुलीवर लोखंडी रॉड तापवून माझ्या पूर्ण शरीराला गरम चटके दिले. यावेळी मी आरडा ओरडा केला तेव्हा कृष्णा चित्ते, माळी, व गोविंद सपकाळ यांनी मला त्यांच्या तावडीतून सोडविले. अन्यथा माझा खून झाला असता. हा धक्कादायक प्रकार ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख नवनाथ दौंड यांच्या सांगण्यावरून करण्यात आला असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. दरम्यान, या प्रकरणात पारध पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा नवनाथ दौंड, सोनू उर्फ भागवत दौंड यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने, उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने करत आहेत.

संपूर्ण शरीरावर दिले जीवघेणे चटके
कैलास गोविंदा बोराडे (३६ रा अनवा ता भोकरदन) हे बुधवारी (दि. 26) नऊ वाजेच्या दरम्यान कार्ला ते जानेफळ रस्त्यावरील वटेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी सोनू ऊर्फ भागवत सुदाम दौंड (रा. जानेफळ गायकवाड) याने मंदिरात महिला दर्शन घेत आहेत, तू दर्शनासाठी मंदिरात जाऊ नको, असे म्हणत कैलास यास अडवले. त्यानंतर जुन्या वाद उकरून काढत तू माझ्या भावासोबत भांडण केले होते. तुला मस्ती आली आहे, असे म्हणून मारहाण सुरू केली. एवढ्यावरच न थांबता सोनू याने लोखंडी रॉड गरम करून कैलास यांच्या पायाला, पोटाला, मानेवर, हाताच्या तळव्यावर, पार्श्वभागावर चटके दिले. जीवघेणे चटक्याने कैलास गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.