नशेसाठी औषधी इंजेक्शन्स, गोळ्यांचे आंतरराज्य कनेक्शन उघड
पुरवठादाराला उत्तरप्रदेश येथून अटक; मिरजेच्या महात्मा गांधी चौक
पोलिसांची कारवाई
मिरज :- नशेसाठी औषधी इंजेक्शन्स, गोळ्या पुरवणाऱ्याला उत्तरप्रदेश येथील मुरादाबाद येथून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक केल्याची माहिती मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली.
इंतजार अली जहीरुद्दीन (वय २५, रा. खलीलपुर, जि. मुरादाबाद, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महात्मा गांधी पोलिसांनी आता आंतरजिल्हा कनेक्शन उघडकीस केले होते. इंतजार अलीच्या अटकेमुळे आंतरराज्य कनेक्शन उघड झाले आहे. आतापर्यंत सांगलीतील रोहित अशोक कागवाडे, ओंकार रवींद्र मुळे आणि अशपाक बशीर पटवेगार यांच्यासह वैभव ऊर्फ प्रशांत शिवाजी पाटोळे (वय २७, रा. कडेगाव, सांगली), ऋतुराज आबासाहेब भोसले (वय २७, रा. सांगलीवाडी, सांगली), अमोल सर्जेराव मगर (वय २८, रा. निमगाव, ता. माळशिरस, सोलापूर), साईनाथ सचिन वाघमारे (वय १९, निमगाव, ता. माळशिरस, सोलापूर), अविनाश पोपट काळे (वय २२, रा. विझोरी, ता. माळशिरस, सोलापूर आणि देविदास शिवाजी घोडके (वय ३३, रा. माळशिरस, सोलापूर), आकाश भोसले, (वय २३, रा. बिजवडी ता. माण जि. सातारा), हणुमंत शिंदे, (वय २४, रा. दसुर ता. माळशिरस जि. सोलापुर), ललीत पाटील (वय २३, रा. आरुळ ता. शाहुवाडी जि. कोल्हापुर)
सांगली शहरात वैद्यकीय वापरासाठी असणाऱ्या मेफेनटर्माइन या इंजेक्शनचा नशेसाठी वापर होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच या इंजेक्शनची तस्करी करणारा एकजण इंजेक्शन विक्रीसाठी सांगली येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकून संशयितांना अटक केली होती. यापूर्वी तिघांना अटक करून १५ लाख रुपयांचे १ हजार ५०० मेफेटर्माइन इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला होता. सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, याची पाळेमुळे खणण्याचे आदेश अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले. त्यानुसार पथकाकडून कसून चौकशी केली जात होती. याप्रकरणी चौकशी केल्यानंतर सांगली जिल्ह्यातील वैभव पाटोळे, ऋतुराज भोसले हे देखील या टोळीत सक्रिय असल्याची माहिती मिळाली. तसेच अमोल मगर, साईनाथ वाघमारे, अविनाश काळे आणि देविदास घोडके, आकाश भोसले, हनुमंत शिंदे, ललित पाटील या संशयितांनी मेफेनटर्माइन इंजेक्शन घेऊन त्याचा साठा करून त्याची विक्री केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना देखील महात्मा गांधी चौक पोलिसांनी अटक केली आहे.
सांगली जिल्ह्यातील मेफेटर्माइन इंजेक्शनच्या तस्करीचे लोन आता आंतरजिल्हा पसरल्यामुळे याबाबत अधिक तपास केला जात होता. त्यातून याचे आंतरराज्य कनेक्शन उघड झाले. त्यानंतर पथकाने उत्तरप्रदेश येथे जाऊन इंजेक्शन्स, गोळया पुरवणाऱ्या इंतजार अली याला अटक केली. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे अधिक तपास करत आहेत.सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक संदीप गुरव, श्रेणी उपनिरीक्षक उदय कुलकर्णी, धनंजय चव्हाण, सचिन कुंभार, अभिजीत धनगर, अभिजीत पाटील, सर्जेराव पवार, सूरज पाटील, राहूल क्षीरसागर, नानासाहेब चंदनशिवे, अमोल तोडकर, विनोद चव्हाण, विकास कांबळे, राजेंद्र हारगे, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, संदीप घोडे, चालक देवानंद नागरगोजे, चालक हणमंत कोळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.