शेपूची भाजी शेपूची भाजी म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं, पण काहीजण नाक मुरडतात. आपल्या सांगली जिल्ह्यात असं एक गाव आहे, जिथं शेपूची भाजी खाल्ली जात नाही.
ऐतवडे खुर्द
सांगलीतल्या या गावाचं नाव आहे, ऐतवडे खुर्द!
या गावाचा एक निराळाच इतिहास आहे.
रंजक इतिहास
या गावात शेपूची भाजी पिकवली जाते, परंतु खाल्ली जात नाही. कारणही रंजक आहे.
ऐतवडे खुर्दचे गावकरी शेपूच्या भाजीला देव मानतात. या
या भाजीला मुघल काळातला इतिहास आहे. पूर्वी दळवी आणि पाटील यांच्यात वर्चस्ववादावरुन कलह होता.
ऐतवडे खुर्द गाव आपल्याकडे पाहिजे, यासाठी युद्ध पेटलं. दळवी गटाच्या लोकांनी बेसावध पाटलावर हल्ला केला आणि गावातील सर्वच पुरुषांना मारुन टाकले.
या युद्धामध्ये एक लहान मुलगा वाचला. एका बाईने त्याला शेपूच्या टोपलीमध्ये लपवून ठेवलं आणि मामाच्या घरी आणून सोडलं.
त्या मुलाच्या मामाचे गाव तुळजापूर होते. त्याचे मामा गायकवाड घराण्यातील होते. १८ वर्षांनंतर त्या मुलाने दळवींवर हल्ला केला आणि ऐतवडे खुर्द गाव जिंकलं.
यासाठी त्याला तुळजापुरातल्या गायकवाड मामांनी मदत केली. शेपूच्या भाजीमुळे पाटील खानदान वाचलं आणि गावही जिंकता आलं.
कथा
म्हणूनच या गावचे लोक शेपूच्या भाजीला देव मानतात आणि भाजी खात नाहीत, अशी कथा गावचे जुने लोक सांगतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.