भारतात 2020 पासून दरवर्षी कर्करोगाचे 13 लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळत आहेत. कर्करोग शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. गेल्या काही वर्षांत तोंडाच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे.
लोक खूप लहान वयातच तोंडाच्या कर्करोगाचे शिकार ठरत आहेत. सामान्यतः असे मानले जाते की, तोंडाचा कर्करोग तंबाखू सेवन केल्याने होतो. हे खरे आहे, पण आता एका नवीन संशोधनातून असे दिसून आले आहे की, तोंडाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या 57 टक्के लोकांनी कधीही तंबाखूचे सेवन केले नव्हते. तरीही ते कर्करोगाचे शिकार ठरले.
तोंडाचा कर्करोग
दरम्यान, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या तोंड, जीभ, घसा आणि घशाखालील भागात सेल्स वेगाने वाढू लागतात तेव्हा त्याला तोंडाचा कर्करोग म्हणतात. केरळच्या व्हीपीएस हॉस्पिटलने केलेल्या संशोधनातून असे दिसून आले की, गेल्या काही वर्षांत तोंडाच्या कर्करोगाचे 57 टक्के रुग्ण असे होते ज्यांनी कधीही तंबाखूचे सेवन केले नव्हते. हे लोक दारुही पीत नव्हते. तरीही या लोकांना तोंडाचा कर्करोग झाला.
पुरुषांमध्ये सर्वाधिक प्रकरणे
संशोधनानुसार, तोंडाचा कर्करोग झालेल्या एकूण रुग्णांपैकी 76 टक्के पुरुष आणि 24 टक्के महिला होत्या. संशोधन करणाऱ्या संशोधकांचे म्हणणे आहे की, हा एक आश्चर्यकारक अभ्यास असून आतापर्यंत वर्षानुवर्षे तंबाखूचे सेवन करणाऱ्या लोकांना तोंडाच्या कर्करोग झाल्याचे आढळून होते. तोंडाची नियमित स्वच्छता न करणे, अनुवंश आणि प्रदूषणामुळे तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता असते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु सध्या हे संशोधन करणारे संशोधक तंबाखूचे सेवन न करणाऱ्या रुग्णांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे कारण काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरवर्षी प्रकरणे वाढत आहेत
भारतात तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण दरवर्षी झपाट्याने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगात तोंडाच्या कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी 12 टक्के रुग्ण हे एकट्या भारतात आहेत. भारतात फुफ्फुसांच्या कर्करोगानंतर तोंडाचा कर्करोग हा पुरुषांमध्ये सर्वात सामान्य कर्करोग आहे. दरवर्षी या आजाराचे 1 लाखाहून अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत.
या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका
सतत तोंडात व्रण येणेजिभेवर किंवा तोंडात लाल किंवा पांढरे ठिपकेतोंडात गाठअन्न गिळण्यास अडचण येणेमान किंवा घशात सूज येणे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.