Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्वतःच्या मुलाला कॉपी पुरवताना नायब तहसीलदाराला रंगेहाथ पकडले !

स्वतःच्या मुलाला कॉपी पुरवताना नायब तहसीलदाराला रंगेहाथ पकडले !
 
 
बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवताना चक्क नायब तहसीलदाराला रंगेहाथ पकडण्यात आल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रावर नायब तहसीलदाराला कॉफी पुरवताना रंगेहाथ पकडण्यात आले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे कॉपी पुरवतानाचा नायब तहसीलदाराचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नायब तहसीलदार अनिल तोडमल यांना बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी देताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. बारावी पेपरमध्ये स्वतःच्याच मुलाला नायब तहसीलदार कॉपी पुरवत असल्याची बाब उघड झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी परीक्षा केंद्रावर ही घटना घडली. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आता संबंधित नायब तहसीलदारावर नेमकी काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.