लखनऊमधील गोमतीनगर एक्सटेंशनमधील भरवारा स्टेट कॉलनीतील स्थानिक रहिवाशांनी एका व्यक्तीवर धर्मांतर करत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणावरून स्थानिकांनी रविवारी (९ फेब्रुवारी) गोंधळ घातला.
राजीव लाल असे आरोप असणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याने आपल्या घरात चर्च बांधले आहे आणि प्रार्थनेसाठी तो आपल्या घरात दर रविवारी दुपारी १ ते ३ च्या दरम्यान १५०-२०० लोकांना घरी बोलावतो. या सभेत धर्मांतराचा खेळ देखील होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजीव लालच्या घराशेजारी राहणारे रितेश मिश्रा म्हणतात की, राजीव लाल लोकांना घरे आणि फ्लॅटचे आमिष दाखवून धर्मांतर करतो. यानंतर, जे ख्रिश्चन धर्मात सामील झाले आहेत त्यांना इतर लोकांना ख्रिश्चन धर्मात आणण्याचे काम दिले जाते.
त्याचप्रमाणे, परिसरातील इतर लोकांचा आरोप आहे की, राजीवच्या घरी येणारे लोक त्यांच्या परिसरात एका विशिष्ट समुदायाच्या लोकांना स्थायिक करत आहेत. हे लोक दुप्पट किमतीत जागा खरेदी करून त्यावर घरे बांधतात आणि धर्मांतर केलेल्यांना ही घरे देतात. कॉलनीतील रहिवाशांच्या मते, राजीव लाल यांनी ५-६ वर्षांपूर्वी त्यांचे घर बांधले होते आणि त्यानंतर सहा महिन्यांनी असे प्रकार घडू लागले. येथे, धर्मांतर करणाऱ्यांना घर किंवा फ्लॅट मिळतो. मात्र, जे नकार देतात त्यांना घरे विकून निघून जाण्यास सांगितले जाते.दरम्यान, स्थानिक लोकांनी आवाज उठवल्यानंतर पोलिसही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घरात प्रवेश करत अनेक मुलींसह ५० हून अधिक लोकांना बाहेर काढले. काही लोकांना पोलीस ठाण्यात नेले आणि त्यांना परिसरातील वातावरण बिघडले तर कारवाईचा इशारा दिला. दरम्यान, त्यावेळी पोलिसांनी धर्मांतराचा आरोप फेटाळून लावला. परिस्थिती लक्षात घेता परिसरात पीएसी दल तैनात करण्यात आल्याचे वृत्त आहे. पोलिस पुरावे गोळा करून प्रकरणाचा तपास करत आहेत. हिंदू समुदायाने या प्रकरणात म्हटले आहे की, जर योग्य कारवाई केली गेली नाही तर येथील चर्च हटवून टाकू आणि दर रविवारी चर्चबाहेर सुंदरकांड पठण करू.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.