Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सगळ्या फायली फेकून देईन, मुंबई हायकोर्टात असे..! न्यायमूर्ती ओक वकिलांवर भडकले...

सगळ्या फायली फेकून देईन, मुंबई हायकोर्टात असे..! न्यायमूर्ती ओक वकिलांवर भडकले...
 
 
सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अभय ओक शुक्रवारी वकिलांवर चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. एका सुनावणीदरम्यान काही वकिलांनी एकाचवेळी आपला बोलण्यास सुरूवात केली. त्यामुळे कोर्टात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे न्यायमूर्ती ओक यांचा पारा चढला. त्यांनी वकिलांना एका-एकाने बोलण्यास सांगितले. पण त्यानंतरही वकिलांचा गोंधळ सुरू राहिल्याने न्यायमूर्ती ओक संतापले.

सुप्रीम कोर्टाचे कामकाज सुरू असताना वकिलांचा हा गोंधळ पाहून न्यायमूर्ती ओक म्हणाले, अशाप्रकारची बेशिस्त पाहून आम्ही त्रासलो आहोत. कोर्टातच रोजच बेशिस्त पाहायला मिळत आहे. आम्ही वकिलांना विचारतो की, कुणाची बाजू मांडणार आहोत. पण वकील काही उत्तर देतच नाहीत, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. बार अँड बेंचने हे वृत्त दिले आहे.

संतापलेले न्यायमूर्ती ओक म्हणाले, 'कोर्टात अशीच स्थिती राहिली तर मी सगळ्या फाईली फेकून देईल. एकाचवेळी वकील बोलू लागले तर त्यांच्या फायली फेकून द्याव्यात, असा नियम कोर्टात करायला हवा. अशी बेशिस्त फक्त सुप्रीम कोर्टात पाहायला मिळते. मी कर्नाटक आणि मुंबई हायकोर्टातही होतो. पण तिथे असे कधी पाहायला मिळाले नाही,' असे न्यायमूर्ती म्हणाले.

सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींना पहिल्यांदाच असा संताप अनावर झालेला नाही. यापूर्वीही न्यायमूर्ती ओक वकिलांवर भडकले आहेत. वकिलांकडून चुकीचा युक्तीवाद केल्यामुळे न्यायमुर्तींनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. सप्टेंबर 2024 मध्ये न्यायमूर्ती ओक आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ड मसीह यांच्या खंडपीठासमोर अशी अनेक प्रकरणे आली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.