बायकोला फासावर लटकलेलं पाहिल्यानंतर नवऱ्यानेही आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. हमीरपूरमधील मेरापूर गावात कौटुंबिक वादातून नवरा-बायकोनं टोकाचं पाऊल उचलले. पत्नीनं गळफास घेतलेलं पाहिल्यानंतर
पतीच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने मुलांना रूमच्या बाहेर काढलं अन्
गळफास घेऊन आयुष्य संपवलं. पोलिसांकडून याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.
आई आणि बापाने आयुष्य संपवल्यानंतर दोन मुलं पोरकी झाली आहेत. कुटुंबावरही दु:खाचा डोंगर कोसळलाय. कुटुंबिय लग्नासाठी बाहेर गेले होते. रात्री जेवणानंतर नवरा बायकोमध्ये कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरत पत्नीने गळफास घेत आयुष्य संपवले. नवऱ्याने पत्नीला मृत अवस्थेत पाहिल्यानंतर स्तब्ध झाला. त्यानेही आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्याआधी त्याने आपल्या दोन्ही मुलांना खोलीच्या बाहेर काढले. त्यानंतर फासी घेत आयुष्याचा शेवट केला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत चौकशी सुरू केली. दोघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पॉरेन्सिक पथकाकडून घराची टेहाळणी करण्यात येत आहे. पोलिसांकडून आत्महत्याच्या कारणाचा तपास सुरू आहे. सोमवारी रात्री ही धक्कादायक घटना घडल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. नवरा-बायकोच्या आत्महत्यामुळे मेरापूर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.रामू वर्मा रोजंदारीचं काम करत होता. दररोज येणाऱ्या पैशांवरच त्यांचं घर चालत होते. त्याला दारू पिण्याची वाईट सवय होती. रामूचं दारू पिणं पत्नीला खटकत होतं,त्यामुळे दोघांमध्ये सतत खटके उडत होते. सोमवारी रात्री रामू दारू पिऊ घरी आला. जेवण झाल्यानंतर त्याच कारणामुळे दोघांत कडाक्याचे भांडण झालं. रूबी नाराज झाली. त्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचलले. दोघांना चार आणि तीन वर्षांचा मुलगा आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.