Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मांत्रिकाचा २० वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार

मांत्रिकाचा २० वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार
 

अमरावती : यापुढे तुझा गर्भपात होणार नाही, पोटही दुखणार नाही, असे म्हणत एका मांत्रिकाने २० वर्षीय विवाहितेवर लैंगिक अत्याचार केला. त्यापूर्वी तिच्या सर्वांगावरून लिंबू फिरवत त्याने अघोरी उपचार करण्याचा दावाही केला.

८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील त्या मांत्रिकाच्या बहिणीच्या घरी ही घटना घडली. याप्रकरणी, गाडगेनगर पोलिसांनी ९ फेब्रुवारी रोजी रात्री ११:५३ वाजता आरोपी मांत्रिक दिगांबर रतन चव्हाण महाराज (रा. जिल्हा अकोला) याच्याविरुद्ध बलात्कार व नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा यांना प्रतिबंध व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियमातील कलम २, ३ (२) या कलमान्वये (अंधश्रद्धा निर्मूलन कायदा) गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पसार झालेल्या मांत्रिकाचा शोध चालविला आहे. आरोपीला चांदुररेल्वे येथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली. मात्र ठाणेदार ब्रम्ह गिरी यांनी प्रतिसाद न दिल्याने त्याला दुजोरा मिळू शकला नाही.
पीडितेच्या मनात आत्महत्येचे काहूर, धमकीचीही भीती
 
आरोपी मांत्रिक काही करेल, या भीतीपोटी पीडितेने घडलेला प्रसंग कुणालाही सांगितला नाही. तिच्या मनात आत्महत्येचे विचार घोंगावू लागले. ती प्रचंड अस्वस्थ झाली. मात्र मनाचा हिय्या करत तिने घडलेला प्रसंग ९ फेब्रुवारी रोजी पती व आईवडिलांना सांगितला. त्यानंतर त्यांनी ९ रोजी रात्री गाडगेनगर पोलिस ठाणे गाठले. तेथे पोलिस उपनिरीक्षक दिनेश सुरपाम यांनी गुन्हा दाखल करवून घेतला. पोलिसांनी गांभिर्याने घेत आरोपीच्या अटकेसाठी पथके मिळविली.

आरोपी पिडिताच्या नात्यातला, त्यामुळे कुटुंबीयांचा विश्वास
यातील २० वर्षीय विवाहित १ पीडिता ही अचलपूर तालुक्यातील एका गावची रहिवासी आहे. तिचे गतवर्षी एप्रिलमध्ये लग्न झाले आहे. ती सासरी पती, सासू, सासरे व दीर अशा कुटुंबासोबत राहते. त्याने पीडितेच्या पतीचा हात २ पाहिला. त्याच्या अंगावर लिंबू घासले. व तुला बाहेरचे तीन लोक लागले आहेत, अशी बतावणी केली. पंचरंगी दोरा बांधला तथा गळ्यात बांधायला तावीजदेखील दिला. लग्नानंतर तिचा तीनदा गर्भपात झाला. तिचे पोट नेहमीच दुखते व सुजत असल्याने तिने त्यावर उपचार देखील घेतले. दरम्यान, ५ फेब्रुवारी रोजी नात्यात असलेला आरोपी दिगांबर चव्हाण महाराज हा तिच्या घरी पोहोचला. ९ फेब्रुवारी रोजी रात्री ११.५३ वाजता गुन्हा दाखल होताच गाडगेनगर पोलिसांनी आरोपी मांत्रिकाच्या बहिणीचे घर गाठले. तेथे विचारणा करण्यात आलौ. मात्र तो तेथून पसार झाला होता.
म्हणे, अमरावतीला ये
 
७ फेब्रुवारी रोजी रात्री १२ नंतर पीडितेचे पोट दुखायला लागले. त्यामुळे पीडितेच्या सासऱ्यांनी आरोपी मांत्रिकाला फोन केला. त्यावर मांत्रिक दिगांबर चव्हाण याने तिला अमरावतीला माझ्याकडे घेऊन या, मी बघतो, काय करायचे, अशी बतावणी केली. त्यानुसार, ८ फेब्रुवारी रोजी सकाळी पीडिता व तिचे सासरे असे दोघे मांत्रिक आरोपीच्या बहिणीच्या घरी आले. त्यावेळी आरोपीने तिला एका दुसऱ्या खोलीत नेले.

सासऱ्यांना पाजली दारू, नातलगांना बाहेर काढले
आरोपी मांत्रिकाने पीडितेच्या सासऱ्यांना यथेच्छ दारू पाजली व घरातील सर्वांना बाहेर काढले. पीडिता ही त्या घरातील खोलीत एकटी असताना त्याने तिच्या डोक्यावर काही मंत्रोपचार केला. तिच्या डोळ्याला व सर्वांगावर लिंबू घासले व त्याने तिच्यावर शारीरिक बळजबरी केली. ती ओरडली असता, तुझ्यावर जादूटोणा करेन व तुला पाहून घेईन, अशी धमकी तिला दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.