Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुम्ही कोणत्या ग्रहावर राहता"? प्रियंका गांधींचा अर्थमंत्र्यांना सवाल; वाढती महागाई, बेरोजगारी मुद्यावर व्यक्त केला संताप

तुम्ही कोणत्या ग्रहावर राहता"? प्रियंका गांधींचा अर्थमंत्र्यांना सवाल; वाढती महागाई, बेरोजगारी मुद्यावर व्यक्त केला संताप


नवी दिल्लीः संसदेत विविध मुद्यांवर चर्चा केली जात आहे. मंगळवारी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांना महागाई आणि बेरोजगारीची परिस्थिती समजू शकत नाही, त्या (निर्मला सीतारमण) कोणत्या ग्रहावर राहतात, असा सवाल प्रियंका यांनी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांना विचारला आहे.त्या म्हणत आहेत की महागाई नाही, बेरोजगारी वाढलेली नाही, किमती वाढलेल्या नाहीत. या उत्तराला अनुसरून मंगळवारी संसदेत अर्थमंत्री सीतारमण यांनी केलेल्या विधानाला उत्तर देताना प्रियांका यांनी हे विधान केले आहे.

 
काय म्हणाल्या निर्मला सितारमण?
निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महागाईचा कल, विशेषतः खाद्यपदार्थांमध्ये, कमी होताना दिसत आहे. त्या असेही म्हणाले की सरकारने 2025-26 मध्ये भांडवली खर्चासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी जवळजवळ संपूर्ण कर्ज वापरत आहे. अर्थमंत्र्यांचे हे विधान प्रियंका गांधींना आवडले नसल्याने त्या अर्थमंत्र्यांवर हल्लाबोल करत होत्या. तसेच प्रियांका गांधी यांनी अर्थमंत्र्यांच्या या विधानावर प्रश्न उपस्थित करत हे विधान वास्तविक ग्राउंड रिअॅलिटीपेक्षा पूर्णपणे वेगळे असल्याचे म्हटले आहे.

लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना सीतारामन यांनी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या घसरणीमागे अनेक देशांतर्गत आणि जागतिक कारणे असल्याचे नमूद केले. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात महागाई दोन अंकी होती, 10 टक्क्यांहून अधिक पोहोचली होती, मात्र सध्या तशी परिस्थिती नाही, असेही त्या म्हणाल्या.

त्याचवेळी मंगळवारी लोकसभेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. यामध्ये राज्यघटनेच्या ८ व्या अनुसूचीमध्ये भोजपुरी भाषेचा समावेश करणे, सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर अश्लील साहित्यावर बंदी घालणे, ट्रेनमध्ये कुल्हारमध्ये चहा विकणे आदी मागण्या करण्यात आल्या. भोजपुरी भाषेचा आठव्या परिशिष्ठात समावेश करावा उत्तर प्रदेशातील सलेमपूर येथील सपा सदस्य रमाशंकर राजभर यांनी सांगितले की, भोजपुरी भाषा जगातील आठ देशांमध्ये बोलली जाते आणि पूर्वांचलमधील प्रत्येक घरात ही भाषा बोलली जाते. या भाषेचा राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात समावेश करावा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.
चहा विकण्याची मागणी

मध्य प्रदेशातील उज्जैनचे भाजप खासदार अनिल फिरोजिया यांनी रेल्वे स्टेशन आणि ट्रेनमध्ये कुल्हारमध्ये चहा विकण्याची मागणी केली. याचा फायदा कुंभारकाम करणाऱ्यांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अशा कार्यक्रमांवर सेन्सारची कात्री लावावी आक्षेपार्ह विधान केलेल्या रणवीर अलाहाबादिया याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया आणि 'ओटीटी' प्लॅटफॉर्मवरील कार्यक्रमांवर सेन्सॉर करण्याची मागणी शिवसेनेचे नरेश म्हस्के यांनी सरकारकडे केली. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.