Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दारुच्या नशेत पत्नीला संपवलं, रक्ताच्या थारोळ्यातही चिमुकला आईला बिलगून राहिला

दारुच्या नशेत पत्नीला संपवलं, रक्ताच्या थारोळ्यातही चिमुकला आईला बिलगून राहिला
 
 
दारुच्या नशेत एका व्यक्तीने पत्नीची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित कुटुंबं मूळचं यवतमाळच्या तेंभुरदरा येथील रहिवासी असून ते उदरनिर्वाहासाठी बाहेरगावी स्थलांतरित झालं होतं. दरम्यान, पतीने दारुच्या नशेत पत्नीची हत्या केली. तसेच पत्नीचा खून केल्यानंतर आरोपीनं याबाबतचा व्हिडीओ नातेवाईकांना पाठवला. हा सगळा प्रकार बघून नातेवाईक हादरले, त्यांनी तातडीनं या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली.

 

पण पोलीस जेव्हा घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा घटनास्थळावरील चित्र बघून पोलीसही हळहळले, मृतदेहाशेजारी महिलेचा लहान मुलगा बसून राहिला होता. तो आईच्या कुशीत शिरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र आई तशीच निपचीत पडून होती. हे दृश्य बघून अनेकांचं काळीज पिळवटून निघालं आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

बालाजी जंगले असं आरोपीचं नाव आहे. तर मीराबाई जंगले हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. यवतमाळच्या महागावजवळील तेंभुरदरा येथील रहिवासी आहेत. बालाजी जंगले आणि मीराबाई जंगले या जोडप्याचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यांना दोन मुले देखील आहेत. यवतमाळ येथून कर्नाटकच्या बेळगावजवळील उप्परट्टी गावात ऊसतोडणीसाठी गेले होते. दरम्यान या जोडप्यामध्ये क्षुल्लक कारणातून वाद झाला. यावेळी दारुच्या नशेत असणाऱ्या आरोपी पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने या क्रूर कृत्याचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आणि तो पत्नीच्या कुटुंबीयांना पाठवला. या घटनेचे वृत्त समजताच गोकाकचे डीएसपी, सीपीआय, पी, एस, आय. यांनी घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला ताब्यात घेतले.


 



मात्र पोलीस घटनास्थळी गेल्यानंतर दिसलेल्या चित्रानं सर्वजण हळहळले. आरोपीनं महिलेची हत्या केल्यानंतर रात्रभर मृतदेह घटनास्थळी पडून होता. सकाळी जेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा महिलेचा लहान मुलगा मृत झालेल्या आईच्या कुशीत शिरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र आई निपचित पडून होती. आईसोबत काय घडलंय, याची काहीच कल्पना त्याला नव्हती. हे दृश्य बघून अनेकांचं हृदय पिळवटून निघालं. पोलिसांनी आरोपीची रवानगी गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्यात केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीकडून मोबाईल जप्त केला आहे.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.