बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांचे खासगी आयुष्य नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिले आहे. अशीच एक अभिनेत्री जिच्या लव्हलाइफपासून ते बोल्ड फोटोशूटपर्यंतची फोटोशूट चर्चा कायम रंगली आहे. आणि आजही ती कोणत्या ना कोणत्या कारणाने
चर्चेत असतेच. ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यामुळेही तितकीच प्रसिद्ध होती.
अनेक बड्या अभिनेत्यांना तिच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. त्यात
सुपरस्टार बॉबी देओलचाही समावेश होता. बॉबी देओलने तर चक्क त्या
अभिनेत्रीला वन नाईट स्टँडची ऑफर दिली होती. हा खळबळजनक खुलासा स्वतः त्या
अभिनेत्रीनेच केला आहे.
ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कुणी नसून ९०
च्या दशकातील गाजलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी आहे. आज ती तिच्या
आध्यात्मिक प्रवासामुळे आणि महाकुंभात किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर
बनल्याने प्रसिद्धीच्या झोतात आली होती. अनेकांनी तिच्या महामंडलेश्वर
बनण्यावर आक्षेप घेतला होता. मात्र आता तिला त्या पदावरून हटवण्यात आले
आहे.
ममता
कुलकर्णी ९० च्या दशकातही तितकीच चर्चेत राहिलेली अभिनेत्री आहे. ती
तिच्या खासगी आयुष्यामुळेच जास्त प्रसिद्धीच्या झोतात राहिली. आपल्या
बोल्डनेस आणि स्पष्टवक्तेपणाने तिने लोकांच्या मनावर राज्य केले होते. हा
सगळा वाद सुरू असताना ममता कुलकर्णीची एक जुनी मुलाखत व्हायरल झाली आहे.
ज्यात तिने एक धक्कादायक खुलासा केला होता, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला
होता.
ममताने तिच्या मुलाखतीमध्ये सांगितल्याप्रमाणे, बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याने तिला चक्क वन नाईट स्टँडची ऑफर दिली होती. एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीमध्ये ममता कुलकर्णीने सांगितले होते की, अभिनेता बॉबी देओलने तिला वन नाईट स्टँडसाठी विचारले होते. हा प्रसंग सांगताना ती म्हणाली, 'मी बरसात सिनेमाची शूटिंग करत होते आणि त्यादरम्यान एका हॉटेलमध्ये थांबले होते. आणि बॉबी देओलही त्याच हॉटेलमध्ये थांबला होता. माझा को-अॅक्टर मिथुन चक्रवर्तीने मला बॉबी देओलशी भेट घालून दिली. बॉबी देओल माझ्यावर फिदा झाला आणि त्यानंतर त्याने माझ्याशी मैत्री वाढवली. त्यानंतर दोघे पार्टीला सोबत यायला जायला लागले.'ममताने पुढे सांगितले, 'जेव्हा ते चांगले मित्र बनले तेव्हा त्याने एक रात्र सोबत घालवण्यासाठी विचारलं.' हे ऐकून अभिनेत्री हैराण झाली. तेव्हा बॉबी देओलचे अफेअर पूजा भट्टसोबत सुरू होते. ही गोष्ट ममताला माहीत होती. त्यामुळे ममताने त्याला माझ्यासोबत एक रात्र घालवायची असेल तर पहिल्यांदा गर्लफ्रेंडची परवानगी घ्यावी लागेल, असं म्हटलं होतं. हे ऐकून बॉबी देओलही थक्क झाला आणि त्याने ही गोष्ट मजामस्तीमध्ये उडवून लावली. पण ममताच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बॉबी देओलचे नाव ऐकून नेटकऱ्यांना नक्कीच धक्का बसला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.