दिल्लीत २७ वर्षांनी भाजपला पुन्हा एकदा सत्ता मिळाली. आम आदमी पार्टीला धूळ चारत भाजपने विजय मिळवला. यानंतर आता दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली आहे. अद्याप भाजपने मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर केलेलं नाही.
मात्र अमेठीच्या माजी खासदार स्मृती इराणी यांच्या नावाची चर्चा होत आहे. भाजप घराणेशाहीच्या विरोधात असले तरी अनेक राजकीय नेत्यांच्या नातेवाईक आणि अपत्यांना तिकीट दिलं होतं. पण घराणेशाही असलेल्या नेत्याला मुख्यमंत्री केलेलं नाही. त्यामुळे प्रवेश शर्मा यांचे नाव मागे पडत आहे. तर रेखा गुप्ता, शिखा रॉय यांच्याही नावाची चर्चा आहे. मात्र यात रेखा गुप्ता यांचे नाव आघाडीवर आहे. पण दिल्लीत केजरीवाल यांच्या तोडीस तोड असा चेहरा आणि महिला मुख्यमंत्री करायीच असेल तर स्मृती इराणी यांचं नाव चर्चेत येत आहे. राजकीय अनुभव, भाजपचा आक्रमक चेहरा आणि २०३० मध्ये केजरीवालांना पुन्हा चितपट करण्यासाठी स्मृती इराणी याचं नाव पुढे आल्यास आश्चर्य वाटायला नको.
देशातील ज्या राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात भाजपची सत्ता आहे तिथं एकही महिला मुख्यमंत्री नाहीय. त्यामुळे किमान एक महिला मुख्यमंत्री असावी असा निर्णय भाजप घेऊ शखते. तसंच अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनीही आतिशी यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं होतं. त्यामुळे केजरीवालांच्या त्या खेळीला महिला मुख्यमंत्री देऊन भाजप शह देऊ शकते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.