Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपा खासदाराच्या लेकासोबत रिंकू राजगुरू अंबाबाईच्या दर्शनाला, फोटो पाहून 'झिंगाट' चर्चा

भाजपा खासदाराच्या लेकासोबत रिंकू राजगुरू अंबाबाईच्या दर्शनाला, फोटो पाहून 'झिंगाट' चर्चा


रिंकू राजगुरू ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सैराट सिनेमामुळे रातोरात स्टार झालेल्या रिंकूचा चाहता वर्ग मोठा आहे. चाहत्यांना भुरळ पाडणारी रिंकू सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. रिंकूचा भाजपा खासदाराच्या लेकासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

 

रिंकू नुकतंच कोल्हापुरला गेली होती. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या चरणी रिंकू नतमस्तक झाली. रिंकूने युट्यूबर कृष्णराज महाडिकसोबत महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतलं. कृष्णराज महाडिकच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन रिंकूसोबतचा महालक्ष्मी मंदिराच्या आवारातील एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोला "आज युथ आयकॉन कृष्णराज महाडिक आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतलं", असं कॅप्शन देण्यात आलं आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
कृष्णराज महाडिकने शेअर केलेल्या या फोटोमुळे चर्चेला उधाण आलं आहे. रिंकू आणि कृष्णराजला एकत्र पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. "महाडिकांची तिसरी सून", "जोडी खूप छान दिसते", "हा फोटो साहेबांना किंवा आईंना पाठवा", "महाडिक साहेबांनी बोललेलं लगेच मनावर घेतलं", "मला वाटलं ठरलं की काय", अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

कोण आहे कृष्णराज महाडिक?
कृष्णराज महाडिका हा भाजपा खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा आहे. कृष्णराज हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. त्याचं स्वतःचं युट्यूब चॅनेल आहे. याशिवाय तो फॉर्म्युला कार रेसरही आहे. अनेक उपक्रमांतून कृष्णराज सामाजिक कार्यात हातभार लावत असतो. यंदाच्या (विधानसभा २०२४) निवडणुकीसाठीही तो उत्सुक असल्याच्या चर्चा होत्या.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.