ज्येष्ठ साहित्यिक रा. र. बोराडे यांचं निधन; साहित्य विश्वावर शोककळा
ज्येष्ठ साहित्यिक रा. र. बोराडे यांचं निधन झालं असून वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. साहित्यिक रा. र. बोराडे यांचं वृद्धापकाळानं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. खासगी रुग्णालय त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र शासनाचा जीवन गौरव पुरस्कार त्यांना घोषित करण्यात आला होता. 27 तारखेला या पुरस्काराचं वितरण होणार होतं, पण त्यापूर्वीच ज्येष्ठ साहित्यिक रा. र. बोराडे यांची प्राणज्योत मालवली.
रा. र. बोराडे यांचा जन्म 25 डिसेंबर 1940 रोजी लातूर जिल्ह्यातील 'काटगाव' सारख्या छोट्याशा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. काटगाव इथे चौथीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी गाव सोडलं. माढा, बार्शी, सोलापूर, संभाजीनगर अशा शहरातून शिक्षण पूर्ण केलं. नोकरीच्या निमितानं त्यांचं वास्तव्य शहरी भागात होतं. तरी मराठवाड्यातील ग्रामीण जीवनानं आणि तिथल्या ऋतूचक्रानं घडविलेला मनःपिंड कायम राहिला.
1957 साली रा. र. बोराडे यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. तिथंपासून ते आजतागायत आपला सृजनात्मक लेखनप्रवास अविरत चालू होता. प्रदीर्घ लेखनकाळ हे वाड्मयविश्वातील अपवादात्मक उदाहरण आहे. 1962 साली आलेल्या'पेरणी' ते 'ताळमेळ', 'मळणी', 'वाळवण', 'राखण', 'गोंधळ', 'माळरान', 'बोळवण', 'वरात', 'फजितवाडा', 'खोळंबा', 'बुरुज', 'नातीगोती', 'हेलकावे', 'कणसं' आणि 'कडबा' यासारख्या कथासंग्रहानी मराठवाडी कष्टकऱ्यांच्या दुःखाला भाषिक आविष्कारातून सार्थ वाचा फोडली.
रा. र. बोराडे यांनी मराठी साहित्यातील ग्रामीण जीवनावर आधारित अनेक कथा, कादंबऱ्या आणि लघुकथा संग्रह लिहिलेत....
पाचोळा
माती
आग
धग
पाऊस
वारा
रान
शोध
झाडं
गंधवार्ता
रा. र. बोराडे यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या
दिसांची राख
भरकटलेली वाट
सरणावरले सूर
कडेलोट
मृगजळ
आपल्या वाड्मयीन कार्याचा सर्व साहित्य संस्थांसह महाराष्ट्र शासन, विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्थांनी पुरस्कार व सन्मानांनी वेळोवेळी गौरव केलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठीय अभ्यासक्रमात आपले लेखन समाविष्ट झाले. याचबरोबर जून 1989 मध्ये हिंगोली येथे भरलेल्या 17 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदांसह विविध ग्रामीण तसेच, इतर अनेकविध साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे आपण भूषवली. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाबाबत आपली भूमिका महाराष्ट्र जाणतोच.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.