कोल्हापूर :-वसुली करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना चोपलं, लाकडाच्या दांडक्याने भररस्त्यात मारहाण
कोल्हापूरमध्ये एका सहकारी बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना बेदम चोप देण्यात आला आहे. वसुली अधिकारी आणि बँकेचे कर्मचारी यांना चोप देतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील रेंदाळ येथे एक विचित्र प्रकार घडला आहे. रेंदाळ येथे वसुली करण्यासाठी आलेल्या बँकेच्या अधिकाऱ्यांना चोप देण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या सदस्यांनी या अधिकाऱ्यांना मार दिला आहे. सहकारी बँकेने दिलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी काही वसुली अधिकारी आणि बँकेचे कर्मचारी रेंदाळमध्ये पोहोचले होते.
तेव्हा महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या सदस्यांनी त्यांचीशी वाद घातला. शाब्दिक वादानंतर त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना मारायला सुरुवात केली. लोकाधिकार समितीच्या सदस्यांकडे लाकडाच्या दांडक्याने या अधिकाऱ्यांनी चोपले. घटनास्थळीहून पळ काढणाऱ्यांनाही त्यांनी पकडून पकडून मार दिला. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आला. कोल्हापूरमधला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.