कर्जाचा हप्ता घ्यायला आलेल्या बँक कर्मचाऱ्याच्या प्रेमात विवाहित महिला पडली. नवऱ्याला सोडून तिने त्या व्यक्तीबरोबर संसार थाटला. बिहारमधील जुमी जिल्ह्यात हा प्रकार घडलाय. बँक कर्मचारी कर्जाचे हप्ते घेण्यासाठी
महिलेच्या घरी जात होता. त्यांच्यामध्ये बोलणं वाढलं अन् प्रेमाचा अंकूर
फलला. मागील पाच महिन्यापासून ते गुपचूप भेटत होते. आता त्यांनी संसार
थाटलाय. त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
नेमकं प्रकरण काय आहे?
11 फेब्रुवारी रोजी हे दोघेजण विवाहबंधनात अडकले. जमुई नगर परिषदअंतर्गत बाबा भूतेश्वर नाथ मंदिरात दोघांनी हिंदू रिती रिवाजाप्रमाणे लग्न केले. बँक कर्मचाऱ्याचे नाव पवन कुमार असे आहे. तो जाजल गावातील राहणारा आहे. महिलेचं नाव इंद्रा कुमारी असे आहे. ती कर्माटांड येथील राहणारी आहे.
महिलेनं बँकेतून घेतलं होतं कर्ज
पवन कुमार फायन्स बँकेत काम करतो. विवाहित महिला इंद्रा कुमारी यांनी एका खासगी बँकेतून कर्ज घेतलं होतं. कर्जाचे हप्ते घेण्यासाठी पवन नेहमीच इंद्रा कुमारीच्या घरी येत होता. दोघांमध्ये बोलणं वाढले. इंद्रा कुमारी याचं पवन याच्यावर प्रेम जडलं. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून गुपचूप भेट होते. तास तास दोघे एकमेंकाना फोनवर बोलत होते. ४ फेब्रुवारी रोजी इंद्रा कुमारीने नवऱ्याला सोडलं अन् पवन कुमार याच्यासोबत फरार झाली.
लग्नानंतर पहिल्या नवऱ्याविरोधात तक्रार -
मिळालेल्या माहितीनुसार, इंद्रा कुमारी हिचं लग्न २०२२ मध्ये झालं होतं. तिचा नवरा सारखाच दारू प्यायचा अन् दररोज मारहाण करायचा. त्यामुळेच बँक कर्मचाऱ्यासोबत इंद्रा कुमारीचं सूत जुळलं. पाच ते सहा महिने गुपचूप भेटल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर इंद्रा कुमारीने नवरा अन् कुटुंबियांवर गंभीर आरोप केला आहे. आपल्या जिवाला धोका असल्याची तक्रार तिने पोलिसांत दिली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा शोध घेतला जातोय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.