Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'उज्वल निकमांचा मुलगा धनंजय मुंडेंची केस लढतो अन् त्यांना संतोष देशमुख...', सुषमा अंधारेंनी सगळा इतिहासच काढला

'उज्वल निकमांचा मुलगा धनंजय मुंडेंची केस लढतो अन् त्यांना संतोष देशमुख...', सुषमा अंधारेंनी सगळा इतिहासच काढला
 

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अॅड.उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निकम यांच्या नियुक्तीने विरोधी पक्षाकडून सरकारवर टीका केली जात आहे. तर, सरकारी पक्षाकडून निकम यांच्या नियुक्तीचे समर्थन केले जात आहे. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी निकम यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी लढलेल्या केसमध्ये न्याय मिळत नसल्याचे सूचित केले आहे.

अंधारे यांनी निकम यांच्या नियुक्तीवर फेसबूकवर पोस्ट करत आपले मत व्यक्त केले आहे. त्यात त्या म्हटल्या आहेत की, 'उज्वल निकम यांच्या नियुक्तीवर आनंद व्यक्त करण्याआधी कृपया सत्यता नीट समजून घ्या. खैरलांजली प्रकरणात सरकारी वकील नेमले होते उज्वल निकम यांना. या प्रकरणात एकूण 40 आरोपी होते. चाळीस वरून त्यांची संख्या 11 वर गेली. फाशीची शिक्षा कुणालाही झाली नाही. खटला चालू असतानाच 11 पैकी दोघांचे मृत्यू झाले. कुटुंबातला शेवटचा माणूस भैय्यालाल न्याय मागता मागता 2017 साली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावला.'

'अ‍ॅड. उज्वल निकम यांच्या मुलानेच धनंजय मुंडे यांची केस लढली होती, हे कृपया विसरून चालणार नाही. उज्वल निकम यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढली. गेल्या दहा वर्षापैकी साडेसात वर्ष त्याच भाजपचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राहिले आहेत. आणि ते गृहमंत्री असतानाच परळी किंवा बीडमध्ये पोलिसांचा हैदोस चालू असतो हे विसरून चालणार नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना बडतर्फ केले नाही', असे म्हणत सुषमा अंधारे यांनी म्हणत निकम यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
'अ‍ॅड. उज्वल निकम प्रकाशझोतात आले ते अजमल कसाब केसमुळे. पण लक्षात घ्या कसाबच्या केस मध्ये कोणीही वकील असता तरी कसाबला फाशीचं झाली असती. कारण त्याच्या विरोधात प्रचंड पुरावे होते आणि राष्ट्रविरोधी कारवाई मध्ये तो घटनास्थळी सापडला होता. याच अजमल कसाबच्या केस मध्ये अजून दोन लोक होते फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन अहमद ज्यांच्या खिशामध्ये राजभवन चा नकाशा सापडला होता अन हे दोन आरोपी सुटलेले आहेत हेही कृपया लक्षात घ्यावे.', असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

देशमुख कुटुंबीयांच्या इच्छेचा सन्मान
उज्वल निकम यांच्या मागील केसमध्ये कसा न्याय मिळाला नाही तसेच ते पीडीत कुटुंबाला कसे मिळवून देऊ शकले नाही हे सांगताना सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे की, आपल्या केस मध्ये वकील कोण असावा कोण नसावा हे ठरवण्याचा संपूर्ण अधिकार हा त्या पिडीत कुटुंबाचा असतो. त्यामुळे उज्वल निकमांची नियुक्ती ही जर धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांना हवी असेल तर तो त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे. आणि आपण त्यांच्या इच्छेचा सन्मान केला पाहिजे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.