Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बाबासाहेबांच्या प्रतिमेसह अनोखा विवाह कार्ड

बाबासाहेबांच्या प्रतिमेसह अनोखा विवाह कार्ड
 


सीकर:  राजस्थानमध्ये सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. लग्नांमध्ये केवळ चांगले जेवण आणि सजावटच नाही तर महागडे कार्डही छापले जातात. पण सध्या राजस्थानमध्ये लग्नाचे एक साधे कार्ड चर्चेचा विषय बनले आहे. ज्याची संपूर्ण राजस्थानमध्ये जोरदार चर्चा होत आहे. कार्डवर संविधान निर्माते डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचे छायाचित्र सर्वसाधारणपणे लग्नाच्या कार्डवर भगवान गणेशाचे छायाचित्र असते पण राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील दांतारामगड तालुक्यातील पचार गावातील रहिवासी लक्ष्मण राव मुंडोतिया यांची कन्या निशा हिच्या लग्नाच्या कार्डवर संविधान निर्माते डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचे छायाचित्र आहे.

 

यापूर्वी देशात अनेकांनी लग्नाच्या कार्डवर डॉ. भीमराव आंबेडकर यांचे छायाचित्र छापले होते. पण कदाचित राजस्थानमध्ये हा पहिलाच प्रकार असावा. जानून घ्या या कार्डला छापण्याचा मुख्य उद्देश्य काय आहे.  निशाचा भाऊ विकी सांगतो की या कार्डला छापण्याचा त्यांचा मुख्य उद्देश्य असा आहे की सध्याची युवा पिढी महापुरुषांना विसरत चालली आहे. पण अशी कार्डे घरोघरी पोहोचली की डॉक्टर भीमराव आंबेडकर नेहमीच लोकांसाठी प्रासंगिक राहतील. आज आंबेडकरांमुळेच दलित आणि महिलांचे जीवनमान सुधारले आहे. 


वधू स्वतः घोड्यावर स्वार होऊन निघेल

विकीने सांगितले की मुलगी घराची लक्ष्मी असते. १३ फेब्रुवारी रोजी त्यांची बहीण निशाचे लग्न होणार आहे. पण या लग्नापूर्वी ते गावात त्यांच्या बहिणीला घोड्यावर बसवून डीजेसह तिची बिंदोरीही काढतील. ज्यामध्ये बरेच ग्रामस्थ सहभागी होतील. विकीने सांगितले की निशाची वरात झुंझुनू जिल्ह्यातील उदयपुरवाटी तालुक्यातून येईल. निशाचे लग्न राजकुमारशी होणार आहे. दोघेही पदवीधर आहेत, सध्या राजकुमार खाजगी नोकरी करत आहेत. तर वधूचे वडील लक्ष्मणराम परदेशात मजुरीचे काम करतात.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.