Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"टकलावर केस उगवणार!'', गॅरंटी देणाऱ्या जादुई तेलासाठी लोकांची झुंबड, गर्दीमुळे शहरात ट्रॅफिक जॅम

"टकलावर केस उगवणार!'', गॅरंटी देणाऱ्या जादुई तेलासाठी लोकांची झुंबड, गर्दीमुळे शहरात ट्रॅफिक जॅम



तरुण वयात डोक्यावरील केस घळणे, टक्कल पडणे हा अनेक पुरुषांसाठी तसा चिंतेचा विषय. अकाली पडलेल्या टक्कलामुळे अशा तरुणांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. मग डोक्यावरील केस घळणं, टक्कल पडणं रोखण्यासाठी कधी औषधं, कधी तेल असे अनेक उपाय केले जातात.

केस गळती आणि टक्कल दूर करण्यासाठी वेगवेगळे सल्ले आजमावले जातात. अशाच केस गळती आणि टक्कल पडलेल्या हजारो लोकांनी आज मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये एकच गर्दी केली होती. येथे टकलावर केस उगवणाऱ्या जादुई तेलासाठी ही गर्दी झालली होती. दिल्लीतून आलेला कुणी सलमान भाई हे तेल लावतो आणि त्यामुळे टकलावर केस उगवतात, अशी वार्ता आजूबाजूला पसरली आणि केस गळीने त्रस्त झालेले लोक हे तेल लावण्यासाठी पोहोचले. मात्र ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा तथाकथित सलमान भाई तिथून पसार झाला.

इंदूरमधील डाकाचाइरा परिसरात टकलावर केस उगवणारं जादुई तेल घेऊन हा तथाकथित सलमान भाई आला होता. त्याच्याकडून हे तेल लावून घेण्यासाठी तरुण, प्रौढ व्यक्तींपासून ते वृद्धांनीही गर्दी केली होती. अगदी पहाटेपासूनच टकलावर तेल लावण्यासाठी या मंडळींनी रांगा लावल्या होत्या. केस गळतीने त्रस्त असलेल्या या व्यक्तींची गर्दी एवढी प्रचंड होती की गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी पोलिसांना तैनात करावं लागलं होतं. एवढंच नाही तर परिसरात मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जॅम झाला होता.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार दिल्लीकर असल्याचं सांगणाऱ्या तथाकथित सलमान भाई एक जादूई तेल आणि औषधं लावून केस गळती आणि टकलावर उपचार करण्याचा दावा केला होता. या दाव्यावर विश्वास ठेवून केस गळती आणि टक्कलामुळे त्रस्त असलेले हजारो लोक इंदूरमध्ये जमले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर टक्कल पडलेल्या लोकांना पाहून इतर लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.