आपल्या भेदडक वक्तव्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकीच आता धोक्यात आली आहे. पडळकर यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून याचिकेतून निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ही याचिका काँग्रेसचे पराभूत उमेदवार किरण सावत यांनी दाखल केली आहे. जत विधानसभा मतदार संघात भाजपने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली होती. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसने विक्रम सावंत यांना तिकीट दिले होते. निवडणुकीत पडळकर यांनी सावंत यांचा 37 हजार 881 मतांनी पराभव केला होता. तर राज्यातील इतर निकांलाप्रमाणेच जतमधील निकाल देखील धक्कादायक ठरला होता. विस्तारित म्हैसाळ योजना, लाडकी बहीण योजना आणि उमदी एमआयडीसी अशा मुद्द्यांवर पडळकर यांनी निवडणूक लढवली होती.
काँग्रेसचे विक्रम सावंत हे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. ते 2019 मध्ये या मतदार संघाचे आमदार राहिले असून पडळकर यांनी लोकसभेनंतर मतदार संघात तयारी केली होती. अवघ्या तीन महिन्यात त्यांनी तेथे वातावरण निर्मिती करत आपला मतदार संघ नसतानाही विक्रम सावंत यांचा पराभव केला. पण आता पुलाखालून बरेच पाणी गेले असून राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. निवडणुकीचा निकाल लागून तीन एक महिने होत असून आता सावंत यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
सावंत यांनी न्यायालयात धाव घेत पडळकर यांच्या आमदारकीला आव्हान दिले आहे. सावंत यांनी मतदार संघात बोगस मतदान झाले असून याचा फायदा पडळकर यांना झाल्याचे म्हटलं आहे. याप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेत EVMवर देखील संशय व्यक्त करण्यात आला आहे. न्यायमुर्ती मिलिंद जाधव यांनी ही याचिका दाखल करून घेतली आहे. तर या प्रकरणावर 28 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.