Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नथुराम गोडसे हा नीच आणि नालायक ब्राह्मण होता! डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता!


नथुराम गोडसे हा नीच आणि नालायक ब्राह्मण होता! डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता!

नथुराम गोडसे हा नीच आणि नालायक ब्राह्मण होता. महात्मा गांधींची हत्या त्याने केली आणि आजचे हिंदुत्ववादी त्या नराधमाचे पुतळे उभारत आहेत. हे धर्मकारण नाही, तर धर्माची मग्रुरी आहे.

अशा धर्मापासून देशाला संरक्षण देण्याची गरज आहे अशी धाडसी वक्तव्य महाराष्ट्र अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी अकोलामध्ये केले आहे. 

अकोला जिल्ह्यातील अकोट येथील शिवाजी विद्यालयात पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने डॉ. सबनीस आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून येणाऱ्या काळात राज्यात वाद पेटण्याची शक्यता आहे. सबनीस एवढ्यावरून थांबले नाहीत, तर सबनीस यांनी मी माझ्या पूर्वजांच्या चुकीची माफी मागतो असे म्हणत नथुराम गोडसे हा नीच होता यावर पुन्हा वक्तव्य केले.

ते म्हणाले, त्या माणसाने महात्मा गांधी यांच्यामधील महात्म्याला मारले आणि त्याचे हिंदुत्व आजचे हिंदुत्ववादी डोक्यावर कपाळावरती टिळा लावून फिरत आहेत. नथुराम गोडसेचे पुतळे मंदिरे उभारत आहेत. अशा घातक विचारधर्मापासून देशाचे संरक्षण करण्याची खरी गरज आहे. विवेकी धर्मनिष्ठ हा महत्त्वाचा विचार आहे. मी माझ्या पूर्वजांनी केलेल्या पापाबद्दल आज तुमच्या सर्वांसोबत माफी मागतो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.