जिल्हयातील मोठी पतसंस्था या नात्याने कर्मवीर पतसंस्थेने इतर
संस्थाना मार्गदर्शक करावे सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदयराव
जोशी
सांगली :- सांगली येथे जिल्ह्यातील पतसंस्थांचे एक दिवशीय प्रशिक्षण शिबीर सहकार भारती व सांगली जिल्हा पतसंस्था फेडरेशन व सांगली जिल्हा नागरी बँक असोशिएशन यांच्यावतीने आणि कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या सौजन्याने येथील दैवज्ञ भवन सांगली येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. उदयराव जोशी बोलत होते.
नुकतेच डॉ. उदयराव जोशी यांची सहकार भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा या संस्थांच्यावतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता. हा सत्कार कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच बुलढाणा अर्बन सोसायटीचे सीईओ श्री. शिरीप देशपांडे यांची सहकार भारती राष्ट्रीय पतसंस्था प्रकोष्ठ पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला होता.
श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांची जैन आर्थिक विकास मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सहकार भारती व पतसंस्था फेडरेशन व नागरी बँक असोशिएशनच्यावतीने डॉ. उदय जोशी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार संपन्न झाला. कर्मवीर पतसंस्थेने देखील वरील मान्यवरांचा सत्कार केला. केंद्रामध्ये सहकार मंत्रालय सुरु झाल्यामुळे सहकारासमोरील आडचणी समजुन घेण्यात येत आहेत. आर्थिक संस्थाना विनाकारण त्रास होणार नाही, सक्तीचे मर्जिंग होणार नाही आणि नविन संस्थांचा विस्तार करणे यावर सरकारचा भर असून सहकारातून विकासात्मक काम करण्यावर भर राहिल अशी भावना डॉ. उदयराव जोशी यांनी व्यक्त केली. सहकारामध्ये काम करण्यास खुप वाव असल्यामुळे झोकून देण्याऱ्या कार्यकर्त्यांना येथे चांगली संधी असल्याचे ते म्हणाले. कर्मवीर पतसंस्थेने या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारुन पतसंस्थाना प्रशिक्षण देण्यासाठी महत्वाची भुमिका घेतल्याबद्दल त्यांनी संस्थेचे कौतुक करुन जिल्हयातील मोठी पतसंस्था या नात्याने कर्मवीर पतसंस्थेने सहकार संवर्धनाचे काम करावे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.त्यांनी यावेळी कर्मवीर पतसंस्थेच्या मुख्यालयास देखील भेट दिली. यावेळीही सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सहकाराची सद्यस्थिती यावर यावेळी सखोल चर्चा झाली, यावेळी पहिल्या सत्रामध्ये पतसंस्थाना इनकम टॅक्स कायद्याबाबत सीए अमित शिंत्रे यांचे व दुसऱ्या सत्रात स्टॅटेजिक मॅनेजमेंट या विषयावर डॉ. राजन पडवळ यांचे मार्गदर्शन झाले. या कार्यक्रमास सांगली अर्बन बँकेचे चेअरमन श्री. गणेशराव गाडगीळ, सांगली जिल्हा बँक असोशिएशनचे अध्यक्ष सुधीर जाधव, जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ए. डी. पाटील, उपाध्यक्ष डॉ. सिध्दनाथ महाडीक, प्रदेश पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख सागर चौगुले, सांगली महानगर अध्यक्ष शशिकांत राजोबा, महिला बैंक प्रकोष्ठ अध्यक्षा सौ वर्षाताई आवाडे सांगली ग्रामीण चे अध्यक्ष सुमंत महाजन, सांगली महानगर महामंत्री शैलेश पवार कर्मवीर चे व्हा. चेअरमन डॉ. अशोक सकळे, डॉ. नरेंद्र खाडे यांची उपस्थिती होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.