Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भरधाव कारमध्ये तरुणाच्या मांडीवर रशियन तरुणी, तिघांना उडवलं; व्हिडिओ व्हायरल...

भरधाव कारमध्ये तरुणाच्या मांडीवर रशियन तरुणी, तिघांना उडवलं; व्हिडिओ व्हायरल...
 

छत्तीसगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजधानी रायपूरमध्ये इंडिगो कारच्या धडकेत स्कूटरवरुन जाणारे तीन तरुण गंभीर जखमी. जखमींना गंभीर अवस्थेत मेकहारा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, ज्या कारस्वाराने तिघांना धडक दिली, तो चालू कारमध्ये चक्क मद्यधुंद रशियन तरुणीसोबत अश्लील चाळे करत होता.


 

 
मिळालेल्या माहितीनुसार, रायपूरमधील तेलीबांध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्हीआयपी चौकात ही घटना घडली. घटनेच्या वेळी कारचा चालक आणि रशियन तरुणी दारुच्या नशेत होते, असा दावा प्रत्यक्षदर्शीनी केला आहे. रशियन तरुणी कार चालवणाऱ्या व्यक्तीच्या मांडीवर बसली होती, त्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि मोठा अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.

 
नशेत असलेल्या रशियन तरुणीने गोंधळ घातला, पोलिसांशीही हुज्जत घातली. रशियन तरुणीचा पोलिसांशी झालेल्या वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कार चालक आणि रशियन तरुणीला ताब्यात घेतले. अधिकारी पुढील तपास करत आहेत. दरम्यान, तीन जखमी तरुणांची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टर त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.