कुर्जुवाडी : घाटणे (ता. माढा) येथील हरिभाऊ जानू लोंढे यांनी गुरुवारी (दि. ६) आत्महत्या करून जीवन संपवलं होतं. हरिभाऊ यांचा विरह सहन न झाल्याने हताश झालेल्या त्यांच्या पत्नीने चार वर्षांच्या मुलीसह त्याच रात्री एकच्या सुमारास सार्वजनिक विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. ९) सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. एकाच कुटुंबातील तीन आत्महत्या झाल्याने गावात शोककळा पसरली.
जनाबाई हरिभाऊ लोंढे (वय ३२) व मुलगी साजरी हरिभाऊ लोंढे वय (४) असे आत्महत्या केलेल्या माय-लेकींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी (दि.६) दुपारी हरिभाऊ जानु लोंढे (रा. घाटणे ता. माढा) घरातील लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यांच्यावर कुडुवाडी ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करुन रात्री घाटणे (ता. माढा) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
अंत्यसंस्कारासाठी उशीर झाल्याने घरात नातेवाईक मुक्कामी होते. त्यानंतर पतीच्या मृत्यूनंतर समोर दुःखाचा डोंगर उभा राहिला होता. पोटच्या सहा मुलींचे पुढे कसे काय होणार याविचाराने हताश झालेल्या पत्नीने त्याच रात्री टोकाचे पाऊल उचलले. रात्री एकच्या सुमारास कोणालाही न सांगता ४ वर्षीय मुलगी साजरी हिला सोबत घेऊन घरातून निघून गेली.मुलांनी ही गोष्ट गावातील ग्रामस्थांना सांगितली. त्यानंतर सदर महिलेचे नातेवाईकही तिथे आले. त्यांनी बेपत्ता असलेल्या माय-लेकी याच आहेत हे ओळखले. पोलिस आणि ग्रामस्थांच्या मदतीने या दोघींना विहिरीतून बाहेर काढून अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत कुर्जुवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर घरात सदर महिला व तिची लहान मुलगी नसल्याचे नातेवाईकांना समजले. त्यावर नातेवाईक व गावातील लोकांनी त्यांची शोधाशोध केली. परंतु, मिळून न आल्याने शुक्रवार (दि. ७) रोजी कुर्जुवाडी पोलिस ठाण्यात जनाबाई हरिभाऊ लोंढे व त्यांची मुलगी साजरी ही बेपत्ता असल्याची नातेवाईकांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर सर्वत्र शोध सुरु असताना (दि. ९) रोजी गावातील शाळकरी मुलांना गावातील जानुबाई मंदिराच्या जवळील सार्वजनिक विहिरीत एक महिला व मुलगी वर तरंगताना दिसली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.