हातात AK47, चेहऱ्यावर हास्य. पत्रकारांवर निशाणा साधत अजित पवार म्हणाले,' महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर.'
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या रोखठोक वक्तव्यांसाठी ओळखले जाते. सभा असो अथवा पत्रकार परिषद स्पष्टवक्तेपणा आणि मिश्लिकपणे उत्तर देण्यासाठी ते ओळखले जातात. अनेकदा, त्यांच्या वक्तव्यांची चर्चा देखील रंगते. आता अजित पवार पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी हातात एके 47 रायफल घेऊन पत्रकारांना मिश्किलपणे दिलेला इशारा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन केले. त्यांनी चाकणच्या निबे उद्योग समूहाला देखील भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी हातामध्ये एके 47 बंदूका घेतल्या होत्या. रायफल हातात घेऊन त्यांनी समोरच्या लोकांवर नेम लावला. त्यानंतर अजित पवार यांनी थेट पत्रकार आणि माध्यमांच्या कॅमेरांवर बंदूक रोखत मिश्किलपणे महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या नाहीतर उडवून टाकू असे म्हणाले. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला.
'महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर बघा', असे मिश्लिक वक्तव्य त्यांनी यावेळी केले. 'आम्ही दोघं तर सगळ्यांना उडवून टाकू', असेही यावेळी ते म्हणाले. त्यांच्या या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हसू अनावर झालं. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील चाकण येथे 'निबे लिमिटेड' प्रकल्पातील अत्याधुनिक क्षेपणास्त्रे, शस्त्र, व सरंक्षण सामग्रीची पाहणी केली. याशिवाय, पिंपरी चिंचवडमधील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण देखील त्यांच्या हस्ते पार पडले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.