महाराष्ट्रात नवीन 73 शाळा सुरु होणार; पण फक्त आठच मराठी शाळा, 65 इंग्रजी शाळांना मान्यता
मुंबई: महाराष्ट्रात नवीन 73 शाळा सुरू होणार आहेत. 73 पैकी 65 शाळा इंग्रजी माध्यमाच्या तर आठ शाळा या मराठी माध्यमाच्या असणार आहेत.
महाराष्ट्र स्वयं अर्थसहायित शाळा अधिनियम 2012 अंतर्गत नवीन शाळा व अस्तित्वात असलेल्या शाळांचे दर्जा वाढ देण्यासाठी आलेल्या प्रस्तावाची छाननी शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे.
नवीन शाळांच्या मंजुरीसाठी आणि असेच असलेल्या शाळांच्या दर्जा वाढीसाठी एकूण 241 पत्र प्राधिकरणाचा प्राप्त झाले होते. त्यानुसार 73 नवीन शाळा येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात सुरू होतील... यामध्ये मुंबईत सर्वाधिक 28 नव्या शाळा सुरू होतील. तर नाशिक आणि पुण्यामध्ये प्रत्येकी 9 शाळा सुरू होणार आहेत.
शाळेमध्ये प्राथमिक आणि माध्यमिकसोबत उच्च माध्यमिक वर्गसुद्धा सुरू केले जाणार-
73 नव्या शाळांमधील 60 शाळा या राज्य मंडळाचे असतील 11 शाळा सीबीएसईच्या तर एक शाळा आयसीएसई आणि एक शाळा केंब्रिज बोर्डाची असेल. 73 नव्या शाळा व्यतिरिक्त 54 अस्तित्वात असलेल्या शाळांना दर जवळ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ज्या शाळेमध्ये प्राथमिक आणि माध्यमिकसोबत उच्च माध्यमिक वर्ग सुद्धा सुरू केले जातील.
कुठे किती नव्या शाळा सुरू होणार?
मुंबई- 28
नाशिक- 9
पुणे- 9
अमरावती- 8
छत्रपती संभाजी नगर- 7
कोल्हापूर- 6
लातूर- 5
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.