पुणे: स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला स्वारगेट पोलिसांनी गुणाट गावातून अटक केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून आरोपीचा शोध सुरू होता, आणि अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. दोन दिवस ऊसाच्या शेतात लपून बसलेल्या
आरोपीला जेवण मिळत नव्हते. त्यामुळे तो रात्रीच्या वेळी आपल्या
नातेवाईकांकडे पाणी पिण्यासाठी जात होता. पोलिसांनी याच माहितीच्या आधारे
त्याचा मागोवा घेतला.
अखेर, रात्री एक वाजता तो कॅनॉलजवळ झोपलेला असताना शोधमोहीम राबवणाऱ्या पोलिसांना दिसला. त्यानंतर तातडीने त्याला ताब्यात घेऊन पुण्याला रवाना करण्यात आले आहे. सध्या त्याला लष्कर पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे. पुढील चौकशीसाठी त्याला पुण्यात हलवण्यात आले असून, तूर्तास एवढेच सांगता येईल, अशी माहिती डीसीपी निखिल पिंगळे यांनी दिली.
आरोपीला पकडण्यासाठी पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांचे 100 जणांचे पथक तयार करण्यात आले होते.-ऊसाच्या शेतात शोध घेण्यासाठी ड्रोन आणि श्वान पथकाचा वापर करण्यात आला.-आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांकडून एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.-आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.बलात्कार करून घरी परतला, दुपारपर्यंत आरामात, नंतर कीर्तनात सहभागी झाला!साडेपाच वाजण्याच्या सुमारास आरोपीने एका तरुणीवर अत्याचार करून शिरूर तालुक्यातील गुणाट गाव गाठले. दुपारपर्यंत तो घरीच होता. त्यानंतर त्याने कीर्तनातही सहभाग घेतला. मात्र, टीव्हीवर बातम्या सुरू झाल्या आणि त्यामध्ये स्वतःचा फोटो दिसताच, त्याने तातडीने घर सोडून पळ काढला
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.