गर्भलिंग निदान करणाऱ्या दवाखान्यावर कळंब्यात छापा, निदानासाठी घेत होते 30 हजार रुपये; रोकड, साहित्य जप्त
गर्भपातासाठी एकूण पाच गोळ्यांचा वापर केला जातो. संबंधित महिलेला एक गोळी खायला दिली जाते. तर दोन-दोन गोळ्या गर्भाशयाच्या मार्गे दिल्यानंतर रक्तस्त्राव होऊन गर्भवात होतो.
कोल्हापूर : दिवसभर घरोघरी फिरून रुग्णसेवा देणाऱ्या महिलांकडून गर्भपाताची औषधे विक्रीचा सुरू असणारा काळा बाजार समोर आला असून, एका कॉलवर मागणी करेल त्या ठिकाणी जाऊन गर्भपाताचे किट त्या दोघी पोहोचवत होत्या. पाच हजार रुपयाला किटची विक्री केल्यानंतर त्या दोघी गर्भपाताचा सल्लाही देत होत्या, असा धक्कादायक प्रकार आरोग्य विभागाने केलेल्या कारवाईतून उजेडात आला.
संशयित सुप्रिया संतोष माने (वय ४२, रा. रायगड कॉलनी, कळंबा) ही वृद्धसेवेचे काम करते. अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना औषधे देणे, त्यांची सेवा करणे ही कामे ती करत होती. तिच्या सोबतच धनश्री अरुण भोसले (३०, रा. शिंगणापूर) हीदेखील काही रुग्णालयांमध्ये कामे करीत होती. दोघींनाही वैद्यकीय क्षेत्रातील कामांची माहिती असल्याने त्यांनी झटपट कमाईसाठी गर्भपाताच्या गोळ्या पुरविण्याचा फंडा अवलंबल्याचे कारवाईत उघड झाले.
गोळ्या देण्यासाठी गाठली वरणगे-पाडळी
आरोग्य विभागाला या दोघींकडून गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यांना रंगेहाथ पकडण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी एक सापळा रचला होता. दोघांना फोनवरून संपर्क करत वरणगे-पाडळी गावात गोळ्या हव्या असल्याचे सांगितले. त्यांनी एका किटसाठी पाय हजार रुपये देण्याचेही मान्य करत वरणगेतील एका घरात बोलावले. दोघीही किट घेऊन त्याठिकाणी पोहोचल्या.
एका दिवसातच गर्भपाताचा सल्ला...
गर्भपातासाठी एकूण पाच गोळ्यांचा वापर केला जातो. संबंधित महिलेला एक गोळी खायला दिली जाते. तर दोन-दोन गोळ्या गर्भाशयाच्या मार्गे दिल्यानंतर रक्तस्त्राव होऊन गर्भवात होतो. अधिकृत गर्भपातासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी घेतला जात असला, तरी संशयित महिला एकाच दिवसात या गोळ्यांचा वापर करण्याचा सल्ला देत होत्या. अशा प्रकरणांमध्ये अतिरक्तस्त्राव होऊन गर्भवतीच्या जीविताला धोका पोहोचू शकतो. पण, याचे कोणतेही तारतम्य नसलेल्या संशयित माने व भोसले यांच्याकडून चुकीचे सल्ले देण्याचेही काम सुरू होते.
पुरवठादार शोधणे गरजेचे
गर्भपाताच्या गोळ्यांची इतक्या प्रमाणात खुलेआम विक्री होत असल्याने याच्या पुरवठादारांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिला डॉक्टर दीपाली ताईंगडेसह इतर दोन्ही महिलांना गोळ्या पुरविणाऱ्यांवरही गुन्हा दाखल केला जाणार आहे. जिल्ह्यात अवैधरीत्या इतक्या प्रमाणात गोळ्या विकणाऱ्यांवर आरोग्य विभागाकडून कोणती कारवाई होणार, हे पाहावे लागेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.