Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

57 कोटी हडपण्यासाठी फितूर असलेला कोल्हापुरातील तो अधिकारी झेडपी की जिल्हा बँकेतला?

57 कोटी हडपण्यासाठी फितूर असलेला कोल्हापुरातील तो अधिकारी झेडपी की जिल्हा बँकेतला?
 

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे  मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून त्यांच्या खात्यावरून 57 कोटी रुपये हडपण्याचा प्रयत्न फसला आहे. त्यांच्याच खात्याचा बनावट धनादेश तयार करून ही रक्कम हडपण्याचा प्रयत्न सतर्क असणाऱ्या अधिकाऱ्यांनी हाणून पाडला आहे.

या प्रकरणानंतर वित्त विभागातील कोल्हापूर  जिल्हा परिषदेमधील अधिकारी घरका भेदी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ठगांना फितूर झालेला तो अधिकारी कोण? याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या खात्यात किती बॅलन्स आहे? चेक नंबर काय आहे याबाबतची माहिती बँकेकडून गुपित ठेवली जाते.

मात्र या संदर्भातील माहिती बाहेर गेली कशी? या दृष्टिकोनातून पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यामुळे पोलिसांचा  संशय फितूर झालेल्या अधिकाऱ्यावर बळावला आहे. सदरची रक्कम फोकस इंटरनॅशनल, जीसीएसएसपी प्रा. लि. व ट्रिन्टी इंटरनॅशनल या कंपन्यांच्या नावे वळविण्याचा प्रकार सुरू होता. तत्पूर्वी 19 कोटींची रक्कम वर्ग करण्यात आली होती. मात्र बँकेची पत्रव्यवहार करत ही रक्कम गोठवण्यात आली.

दरम्यान त्याबाबतचे तक्रार जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी कृष्णात लक्ष्मण पाटील (वय 52, रा. नेर्ली, करवीर) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे. जिल्हा परिषदेमधील वित्त विभागातील 57 कोटींचे रक्कम बनावट धनादेशाद्वारे वटवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नियोजन पद्धतीने रचलेला हा कट कोणत्यातरी अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाल्याचा संशय पोलिसांना आहे.

मंगळवारी पहिल्या टप्प्यात 18 कोटी चार लाख तीस हजार रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली होती. शिवाय बुधवारी (आज) पैसे हडप करण्याचा डाव संबंधित यंत्रणेने आपला होता. मात्र वेळीच ही बाब लक्षात आल्याने ही रक्कम गोठवण्यात आली. दरम्यान या घटनेच्या खोलात जाऊन माहिती घेतल्याने 57 कोटी रुपये हडपण्याचा डाव हाणून पाडला आहे.

प्रकरण उघडकीस कसे आले?
जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने कोल्हापूर जिल्हा बँकेत  जाऊन आपल्याकडील असलेल्या धनादेश बाबतची माहिती घेतली. उपलब्ध असलेल्या धनादेशाबाबत तपासून पाहिले असता दोन्ही धनादेशांमध्ये तफावत आढळून आले. त्यामुळे परस्पर रक्कम हडप करण्याचा डाव उघडकीस आला.

जिल्हा बँकेच्या धनादेशावरील हे शेवटचे सात अंक स्टपिंग असतात, मात्र त्यावरील अंक हे छापील होते. शिवाय चेकवरील इंग्रजी अक्षरांचे देखील तफावत आढळून आली. त्यावरील स्पेलिंग मिस्टेक दिसून आली. शिवाय अधिकाऱ्यांच्या नावात देखील तफावत मिळवून आली. मात्र शांत डोक्याने काम करत असलेल्या फितूर अधिकारी कोण?

त्याच्या डोक्यात इतका कट शिजला कसा? हे शोधण्याचे काम आता पोलिसांचा आहे. त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र गेल्या काही वर्षात कोरोना, पोषण आहार घोटाळा त्यामुळेच चर्चेत असलेली जिल्हा परिषद पुन्हा एकदा या घोटाळ्याने चर्चेत येण्याची शक्यता होती. मात्र वेळीच हा प्रकार रोखल्याने बसणारा फटका रोखता आला. फितूर अधिकारी कोण? हे पोलिस तपासात निष्पन्न होईलच.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.