Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

50 रुपयांसाठी लाडकी बहीणचं सर्वेक्षण थांबवलं, नेमकं काय घडलं?

50 रुपयांसाठी लाडकी बहीणचं सर्वेक्षण थांबवलं,  नेमकं काय घडलं?


नागपूर: लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यावर 1500 रुपये येतात. मात्र या योजनेत आता निकष कठोर करण्यात आले असून सर्वेक्षण सुरू झालं आहे. ज्या ज्या भागातून तक्रारी आल्या तिथे सर्वेक्षण केलं जात असून निकषांत न बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जात आहे.

त्यात अनेक महिलांनी स्वत: हून अर्ज मागे घेतले आहेत. आता जागोजागी सर्वेक्षण केलं जात आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या आणखी कमी होऊ शकते. मात्र आता हे सर्वेक्षण करण्यास अंगणवाडी सेविकांनीच नकार दिला आहे. नेमकं त्यामागे कारण काय आहे? ते समजून घेऊया.

महिलांनी दिला नकार
लाडक्या बहिणीच्या सर्वेक्षणास अंगणवाडी सेविकांचा नकार दिला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरण्यासाठी शासनाने निश्चित केलेला प्रोत्साहन भत्ता अद्याप पर्यंत मिळाला नाही. त्यात आता लाडक्या बहीण योजनेचे सर्वेक्षणाचे काम करायचे असल्याने सेविकांनी नकार दिला. लाडकी बहीण योजना अमलात आणली तेव्हा अर्ज भरणाऱ्या सेविकांना प्रति अर्ज पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता सरकार देणार होतं. मात्र त्याचे पैसे अद्याप थकीत असल्याने नव्याने सर्वेक्षणास सेविकांनी नकार दिला.
या महिलांचे अर्ज बाद होणार

विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेत राज्यभरात सर्वेक्षण केलं जात आहे. ज्या महिला निकषात बसत नाहीत त्यांचे अर्ज बाद केले जात असून त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. या महिलांकडून पैसे वसूल केले जाणार नाहीत असंही मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं होतं. ज्या महिला निकषांत बसत नाहीत त्यांनी आपले अर्ज मागे घ्यावेत असं आवाहन देखील त्यांनी केलं होतं.
लाडकी बहीण योजनेंतर्गत किती मिळणार पैसे?
लाडकी बहीण योजनेंतर्गत 1500 रुपये प्रत्येक महिन्याला लाभार्थींच्या खात्यावर येतात. जुलै 2024 पासून लाभार्थी महिला आणि तरुणींना या योजनेचा लाभ मिळत आहे. आतापर्यंत सात हप्ते महिलांच्या खात्यावर जमा झाले असून आठवा हप्ता कधी येणार याची प्रतिक्षा आहे. त्यातही अनेक महिलांचे बायोमेट्रिक न झाल्याने पैसे खात्यावर आले नाहीत. त्यामुळे ज्या महिलांना सहावा, सातवा हप्ता मिळाला नाही ते आता एकत्र येणार आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.