Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दाम दुप्पट करण्याच्या आमिषात मॅनेजरनेचं लुटली बँक; ड्रायक्लीनर्सवरच्या छापेमारीत 5 कोटींची रक्कम पकडली, 9 जण ताब्यात

दाम दुप्पट करण्याच्या आमिषात मॅनेजरनेचं लुटली बँक; ड्रायक्लीनर्सवरच्या छापेमारीत 5 कोटींची रक्कम पकडली, 9 जण ताब्यात


भंडाऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात दाम दुप्पट करण्याच्या प्रलोभनाला नागरिक बळी पडल्याचं आतापर्यंत अनेकदा ऐकिवात आहे. मात्र, भंडाऱ्यात चक्क अॅक्सिस बँकेचा मॅनेजरचं दाम दुप्पट करण्याच्या अमिषाला बळी पडला आणि त्यानं चक्क बँकचं लुटल्याची थक्क करणारी घटना समोर आली आहे.


भंडाऱ्याच्या तुमसर इथं अॅक्सिस बँक असून, गौरीशंकर बावनकुळे असं बँक मॅनेजरचं नाव आहे, ज्यांनी दाम दुप्पट करून मिळेल या हव्यासापोटी चक्क बँकेतील 5 कोटी रुपये लुटल्याची थक्क करणारी घटना समोर आली आहे. या मॅनेजरला बँकेतीलचं एका कर्मचाऱ्यानं साथ दिली असून बँकेतून काढलेली संपूर्ण रक्कम तुमसरच्या इंदिरानगर येथील राजकमल ड्रायक्लीनर्समध्ये ठेवली होती. मॅनेजरसह दिल्ली, उत्तराखंड, रायपूर, गोंदिया अन् भंडाऱ्यातील 9 जणांना घेतलं ताब्यात अॅक्सिस बँक मॅनेजरला दिल्ली, उत्तराखंड, रायपूर, गोंदिया येथील एका टोळीनं कोटी रुपयांच्या बदल्यात 7 कोटी रुपये देण्याचं आमिष दिलं होतं. 

 या आमिषाला बळी पडलेल्या मॅनेजरनं बँकेतून ही रक्कम काढली होती. मात्र, भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांना याची गुप्त माहिती मिळाली आणि त्यांनी पोलिसांच्या मदतीनं राजकमल ड्रायक्लीनर्सवर छापा टाकला. यात संपूर्ण 5 कोटीची रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली. ही संपूर्ण रक्कम मोजण्याकरिता बँकेतील पैसे मोजण्याच्या मशीनचा वापर भंडारा पोलिसांना करावा लागला. भंडारा पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 5 कोटींची रक्कम जप्त केली असून बँक मॅनेजरसह 9 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

भंडाऱ्याच्या जांब गावात मध्यरात्री दोन ठिकाणी घरफोडी
भंडारा जिल्ह्याच्या आंधळगावं पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जांब गावात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी केली. एका घरात चोरट्यांना काहीचं मिळालं नसलं तरी, दुसऱ्या घरातून त्यांनी ७५ हजार रुपये रोख आणि लाखो रुपये किंमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. हा सर्व प्रकार सकाळी उघडकीस आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र या चोरीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शहरात वाढत्या चोरी आणि गुन्हेगारीच्या घटना बघता पोलीस प्रशासनाने अधिक कठोर कारवाई मोहीम राबावत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.