एकनाथ शिंदेंच्या 3 लोकप्रिय योजनांना मुख्यमंत्री फडणवीसांचा ब्रेक? 'आनंदाचा शिधा', 'शिवभोजन थाळी' बंद होणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रिय योजनांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रेक लावल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना
थांबवण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतला आहे. तसेच 'आनंदाचा शिधा'
योजना देखील थांबवण्याचा फडणवीस सरकारचा विचार असल्याची माहिती सूत्रांनी
दिली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदी असताना एकनाथ शिंदेंनी तीर्थदर्शन योजनेची घोषणा केली होती. ज्येष्ठ नागरिकांना प्रमुख स्थळांचे तीर्थदर्शन मोफत घडवले जात होते. मात्र आता ही तीर्थदर्शन योजना थांबवण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतला आहे. 'आनंदाचा शिधा'ही योजना देखील थांबवण्याचा फडणवीस सरकारचा विचार करत आहे. तिजोरीवर आर्थिक ताण वाढल्यानं मोफत योजना थांबवण्याचा विचार सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे 'शिवभोजन थाळी'योजनाही बंद करण्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना नेमकी काय होती?
राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक, म्हणजेच ज्यांचं वय 60 वर्ष किंवा त्याहून अधिक आहे, अशा व्यक्तींना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' सुरू करण्यात आली होती. राज्यातील ज्यष्ठे नागरिकांना तीर्थयात्रा मोफत उपलब्ध करुन देणं हे 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' सुरू करण्याचं मुख्य उद्दीष्ट होतं. आपलं दैनंदिन कर्तव्य पार पाडीत असताना देखील आपल्या देवदेवतांचं/भगवंतांचं नामस्मरण, चिंतन करत आयुष्य जगत असतात. देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांचीही मोठी तीर्थस्थळं आहेत. जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचं बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचं स्वप्न असतं. पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते. परंतु गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे वा कोणी सोबत नसल्यानं आणि पुरेशी माहिती नसल्यानं अनेक ज्येष्ठ नागरिकांचं तीर्थयात्रा करण्याचं स्वप्न पूर्ण होत नाही. सदर बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाऊन मनःशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणं सुकर व्हावं, यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची/दर्शनाची संधी देण्यासाठी 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना' सुरू करण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंनी घेतला होता.
एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापनावरुनही वगळले-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापनावरुनही वगळण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारही आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये आहे. मात्र नगरविकास मंत्री असून एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळले आहे. महसूल,मदत पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन व आरोग्यमंत्री समितीवर आहेत. मुंबईतल्या जुलै 2005 च्या महापुरानंतर आपत्ती व्यवस्थापनाची स्थापना करण्यात आली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.