'अहो साहेब मी तो नव्हेच...', पोलिसांना वाटलं दत्ता सापडला, 'राम आणि श्याम' पाहून 15 मिनिटं उडाला होता गोंधळ
स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये 26 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार करणार्या दत्तात्रय रामदास गाडे याला काल रात्री अखेर अटक करण्यात आली आहे. गुणाट या राहत्या गावी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
ज्या शेतात दत्ता गाडेला शोधण्यासाठी सर्च ॲापरेशन सुरु होतं तिथं तो नव्हताच, तिथं तो सापडलाच नाही. पण नातेवाईकांच्या घरी जेव्हा गेला, तेव्हा आरोपी गावातच असल्याचं पोलिसांना समजलं. त्यानंतर एका कॅनॉलमध्ये झोपलेल्या अवस्थेत दत्ता गाडे सापडला. पण पोलिसांकडून दत्ता गाडे समजून दुसऱ्याच गाडेला उचललं होतं.
दत्ता गाडे अन् 'राम आणि श्याम'
पोलिसांचे पथक तातडीने आरोपीच्या शिरूर तालुक्यातील गुनाट या गावी पोहोचलं. पोलिसांकडे आरोपीचा फोटो होता. आरोपीसारखा दिसणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. दत्ता सापडला असं पोलिसांना वाटलं अन् पोलीस अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. पण पुढं असं काही झाली की, पोलिसांनी डोळ्यावर आणि कानांवर विश्वास बसला नाही.
तुम्ही दत्ताला शोधताय ना?
आरोपी नसून त्याच्यासारखा हुबेहुब दिसणारा त्याचा भाऊ असल्याचे 15 ते 20 मिनिटांनी स्पष्ट झालं. आरोपीच्या घरावर धाड टाकली. तेव्हा घरामध्ये त्याचा भाऊ होता. तो दिसायला अगदी आरोपीसारखा असल्याने पोलीसही चक्रावले. तो मी नव्हेच असं दत्ताचा भाऊ सांगत होता. माझा भाऊ माझ्यासारखा दिसतो, तुम्ही दत्ता गाडेला शोधताय ना? असा प्रश्न दत्ता गाडेच्या भावाने केला. त्यानंतर पोलिसांनी दत्ता गाडेच्या भावाला सोडून दिलं. त्याआधी त्याची चौकशी देखील करण्यात आली. दरम्यान, आरोपी दत्ता गाडे याची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. रात्री 2 वाजता त्याला पुण्यात आणलं. 3 वाजता त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आज त्याला कोर्टात हजर करणार येणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.