रोजचं भाडं 10 लाख रुपये... मुंबईतलं सर्वात महागडं दुकान; 206 कोटींचं रेंट अँग्रीमेंट
जगप्रसिद्ध फॅशन बॅण्ड असलेल्या 'झारा'ने मुंबईमधील आपलं एक महत्त्वाचं स्टोअर बंद केलं आहे. दक्षिण मुंबईमधील फ्लोरा फाऊंट येथील 118 वर्ष जुन्या इस्माइल इमारतीमध्ये असलेलं 'झारा'चं सर्वात महत्त्वाचं स्टोअर बंद झालं असून या ठिकाणी आता 'पर्पल स्टाइल लॅब्स' या फॅशन इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध बॅण्डचं स्टोअर सुरु होणार आहे. 60 हजार स्वेअर फुटांची ही जागा 'पर्पल स्टाइल लॅब्स'ने पाच वर्षांचा करार करत भाडेतत्वावर विकत घेतली आहे. या जागेसाठी वर्षाकाठी 36 कोटी रुपये भाडं 'पर्पल स्टाइल लॅब्स'कडून दिलं जाणार असल्याचं प्रॉपस्टेक डॉटकॉमने कागदपत्रांच्या आधारे दिलं आहे.
दिवसाचं भाडं 10 लाख रुपये
कागदपत्रांनुसार हा करार पाच वर्षांसाठी झाला असून पाच वर्षात या जागेसाठी 'पर्पल स्टाइल लॅब्स' कंपनी तब्बल 206 कोटी रुपये भाडं देणार आहे. कागदपत्रांमध्ये या ठिकाणाचं दिवसाचं भाडं 10 लाख रुपये इतकं असेल असं म्हटलं आहे. 'पर्पल स्टाइल लॅब्स'ची स्थापना अभिषेक अग्रवाल यांनी 2015 साली केली आहे. अत्यंत हाय एण्ड म्हणजेच महागडे कपडे विकणाऱ्या या बॅण्डकडून 'प्रिनियाज पॉप-अप शॉप' हे बॅण्डनेम वापरुन कपडे विकली जातात. सध्या या बॅण्डचे जुहू आणि वांद्रे येथे स्टोअर्स आहेत.स्टॅम्प ड्युटी म्हणून 53 लाख रुपये भरले
आता 'पर्पल स्टाइल लॅब्स'ने भाड्याने घेतलेल्या या नव्या जागेचं एकूण क्षेत्र 59 हजार 350 स्वेअर फूट इतकं आहे. या जागेसाठी महिन्याला 3 कोटी रुपये आणि वर्षभरात 36 कोटी 'पर्पल स्टाइल लॅब्स'कडून मोजले जाणार आहेत. दुसऱ्या वर्षी भाडं वाढून 39 कोटी इतकं होईल तर तिसऱ्यावर्षी 42 कोटी रुपये मोजावे लागणार आहे. चौथ्या वर्षी 43.8 कोटी रुपये वार्षिक भाडं मोजावं लागणार असून पाचव्या वर्षी हा आकडा 45.6 कोटी रुपये इतका असणार आहे. या व्यवहारासाठी 'पर्पल स्टाइल लॅब्स'ने 18 कोटी रुपये डिपॉझिट दिलं आहे. हा सर्व व्यवहार 23 डिसेंबर 2025 यासाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून 53 लाख रुपये भरले आहेत.
'झारा'ने का स्टोअर बंद केलं?
या ठिकाणी मागील 9 वर्षांपासून स्पॅनिश फॅशन बॅण्ड असलेल्या 'झारा'चं स्टोअर होतं. 'झारा'ने 23 फेब्रुवारी रोजी सर्व कारभार मूळ मालकाकडे सोपवला. 21 वर्षांचा करार 'झारा'ने 2016 साली केलेला. मात्र 9 वर्षातच त्यांनी हे स्टोअर बंद केलं. या ठिकाणचं भाडं कंपनीला परवडेनासं झालं. तसेच केवळ या ठिकाणी स्टोअर असल्याने कंपनीची ओळख आहे असंही काही नसल्याने कंपनीने करार मोडत काढत स्टोअर बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.