बांगलादेशातील हवाई दलाच्या तळावर मोठा हल्ला, 1 जण ठार; अनेकजण जखमी; लष्कराने घेतला ताबा
ढाका: बांगलादेशमधील हवाई दलाच्या तळावर मोठा हल्ला झाला आहे. सोमवारी (24 फेब्रुवारी) कॉक्स बाजार शहरातील हवाई दलाच्या तळावर काही हल्लेखोरांनी हल्ला केला, ज्यामध्ये एक जणाचा मृत्यू झाला.
बांगलादेश लष्कराची मीडिया विंग इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने सांगितले की, हा हल्ला जवळच्या समिती पारा भागातील काही हल्लेखोरांनी केला. यानंतर, लष्कराने तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. बांगलादेशी माध्यमांनुसार की, परिस्थिती हाताळण्यासाठी हवाई दल आवश्यक पावले उचलत आहे.
हल्ल्यात एक जणाचा मृत्यू
दरम्यान, सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत एकाचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले, असे कॉक्स बाजारचे उपायुक्त मोहम्मद सलाहुद्दीन यांनी सांगितले. दुसरीकडे, दोन गटातील हाणामारीमुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. कॉक्स बाजार जिल्हा सदर रुग्णालय पोलिस चौकीचे प्रभारी सैफुल इस्लाम यांनी सांगितले की, स्थानिक व्यापारी शिहाब कबीर यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले.
सुरक्षा दलाने घटनास्थळाला वेढा घातला
स्थानिक माध्यमांनुसार, बांगलादेशी सैन्य कोणालाही घटनास्थळी जाऊ देत नाहीत. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून तपास सुरु आहे. यामुळे संपूर्ण परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. प्रशासनाने स्थानिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. सुरक्षा संस्था हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांचा हेतू शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
बांगलादेशात अशांतता
गेल्या वर्षी जूनपासून बांगलादेश सतत अशांततेतून जात आहे. शेख हसीना यांची हकालपट्टी झाल्यापासून देशात पूर्णवेळ सरकार नाही. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार देशात राज्य करत आहे. अशा परिस्थितीत, हवाई दलाला लक्ष्य करण्याची घटना बांगलादेशच्या सुरक्षा व्यवस्थेवर एक मोठे सवाल उपस्थित करते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.