Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हातपाय पडतील निळे शरीराचाही होईल सांगाडा; शाकाहारी खाणाऱ्यांना अधिक धोका, Vitamin B12 युक्त 5 पदार्थ खायलाच हवेत

हातपाय पडतील निळे शरीराचाही होईल सांगाडा; शाकाहारी खाणाऱ्यांना अधिक धोका, Vitamin B12 युक्त 5 पदार्थ खायलाच हवेत
 

निरोगी राहण्यासाठी फळे, भाज्या आणि सुकामेवा खाणे महत्वाचे आहे. यापासून आपल्याला जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने मिळतात. हे पोटासाठी देखील खूप चांगले आहेत. शाकाहारी आहार घेणाऱ्यांमध्ये हृदयरोग, मधुमेह आणि फॅटी लिव्हरचा धोका कमी असल्याचे दिसून येते. परंतु या लोकांना कोबालामिनची कमतरता नावाच्या समस्येचा धोका जास्त असतो.

रक्त निर्मितीसाठी कोबालामिन आवश्यक आहे. त्याच्या कमतरतेमुळे मजबूत शरीर कमकुवत, कोरडे आणि बारीक होऊ शकते. यामुळे मेंदूची काम करण्याची क्षमताही कमी होते आणि हाडांची ताकदही कमी होऊ लागते. बहुतेक भाज्या, धान्ये आणि फळांमध्ये हे पोषक तत्व नसते आणि जरी ते असले तरी ते खूप कमी प्रमाणात उपलब्ध असते.
अशक्तपणा व्यतिरिक्त, कोबालामिनची कमतरता देखील दृष्टी कमी करू शकते. गर्भवती महिलांना औषध घेऊन ही आवश्यकता पूर्ण करावी लागते, अन्यथा नवजात बाळाला अनेक आजार होऊ शकतात. जर तुम्हाला हे सर्व धोके टाळायचे असतील तर व्हिटॅमिन बी-१२ समृद्ध असलेले पदार्थ खा. या जीवनसत्वाचे दुसरे नाव कोबालामिन आहे. यासंदर्भात डॉक्टर माधव भागवत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

 

काळंनिळं पडेल शरीर

लाल रक्तपेशींचे कार्य रक्तात ऑक्सिजनचे संचारण करणे आहे. या पेशी बनवण्यासाठी शरीराला कोलोबामाइनची आवश्यकता असते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सायनोसिस होऊ शकतो. यामुळे हात, नखे आणि त्वचा निळी होऊ लागते. याचा त्रास तुम्हाला होऊन गंभीर आजाराचा सामनाही करावा लागू शकतो
गाईच्या दुधाचा उपयोग

गाईचे दूध पिण्यास सुरुवात करा. जर तुम्हाला दुधाची अ‍ॅलर्जी नसेल, हृदयरोग नसेल, कोलेस्ट्रॉल नसेल आणि तुमची शारीरिक हालचालही चांगली असेल तर तुम्ही दररोज दूध पिणे हे फायदेशीर ठरते. विटामिन बी१२ च्या कमतरतेसाठी तुम्ही नियमित दुधाचे सेवन करावे. एफडीएच्या मते, फुल क्रीम दुधात व्हिटॅमिन बी१२ च्या दैनंदिन गरजेच्या ४६ टक्के असते. त्यामुळे याचे नियमित सेवन करणे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरते

फोर्टिफाईड न्यूट्रिशनल यीस्ट
तुमच्या शाकाहारी आहारात हे पदार्थ कधीही समाविष्ट करायला विसरू नका. हे पूर्णपणे शाकाहारी आहे आणि व्हिटॅमिन बी १२ ने समृद्ध आहे. फक्त २ चमचे पौष्टिक यीस्ट आवश्यकतेपेक्षा ७ पट जास्त पोषण प्रदान करते. या पावडरमधून प्रथिने, खनिजे आणि इतर जीवनसत्त्वे देखील मिळतात.
अंड्याचा करा वापर

काही जण वार पाळतात अथवा काही जणांना अंडे खाऊन चालत नाही. मात्र ज्यांना खायला मिळते त्यांनी दररोज २ उकडलेले अंडे खावेत. केवळ या प्रमाणात, ४६ टक्के गरज पूर्ण होईल. त्यात व्हिटॅमिन बी२, प्रथिने, बायोटिन, कोलीन असते. स्नायूंच्या बळकटीसाठी आणि मेंदू जलद काम करण्यासाठी हे आवश्यक आहेत. अंड्यामुळे तुमच्या शरीरातील विटामिन बी१२ ची असणारी कमतरता कमी होण्यास मदत मिळते.

कलेजी वा प्राण्यांचे मांस
प्राण्यांच्या मांसामध्ये व्हिटॅमिन बी १२ चे प्रमाण सर्वाधिक असते. जे लोक प्राण्यांचे यकृत आणि मूत्रपिंड खातात त्यांना याची काळजी करण्याची गरज नाही. ते पचवण्यासाठी तुम्हाला फक्त शारीरिक हालचाल वाढवावी लागेल आणि कोलेस्टेरॉल वाढू देऊ नये. अनेकांना कलेजी खायला आवडते. आपल्या आहारामध्ये याचा समावेश करून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते
खाऱ्या पाण्यातील मासे

सार्डिन हे लहान आणि मऊ हाडे असलेले खाऱ्या पाण्यातील मासे आहेत. हे खाल्ल्याने कोबालामिनची आवश्यकता पूर्ण होऊ शकते. हे ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिडचादेखील एक चांगला स्रोत आहे, जे जळजळ नियंत्रित करू शकते. यामुळे तुम्ही आपल्या आहारामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने ठराविक प्रमाणात खाऱ्या पाण्यातील माशांचा समावेश करून घेऊ शकता

टीप:   हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.