Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ITR फाइलिंगसाठी CA किती फी घेतात? वाचा एका क्लिकवर

ITR फाइलिंगसाठी CA किती फी घेतात? वाचा एका क्लिकवर
 

इनकम टॅक्स रिटर्न भरणे प्रत्येकासाठी गरजेचे असते. अनेकांना इनकम टॅक्स रिटर्न फाइलिंग करण्याचे अनेक मार्ग आहेत तसेच नियम आणि खर्च देखील आहे. याबद्दल आज सविस्तरपणे जाणून घेऊया.

CA मार्फत इनकम टॅक्स रिटर्न फाइलिंग 

बहुतेक करदाते आयकर रिटर्न भरण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट (CA) ची मदत घेतात. यासाठी सीए पैसे घेतात. सीए तुमचा फॉर्म-16 आणि फॉर्म 26AS सारख्या कागदपत्रांच्या आधारे ITR प्रक्रिया पूर्ण करतो. यामध्ये रिटर्न तयार करणे आणि सबमिट करणे या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. 

CA किती फी घेतात?
या सेवांसाठी सीए साधारणपणे 1500 ते 2000 रुपये आकारतात. तुमचा रिटर्न किती गुंतागुंतीचा आहे यावर अवलंबून, आयटीआर भरण्याचे फी आणखी जास्त असू शकते.
इनकम टॅक्स भरण्याचे फायदे

दरवर्षी इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरणे तुमच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. त्याचा पहिला फायदा असा आहे की जर तुम्ही जादा कर भरला असेल तर तुम्ही रिटर्न भरून परतावा मिळवू शकता. आयटीआर फाइल करणाऱ्या व्यक्तीला बँकांकडून सहज कर्ज मिळते. एवढेच नाही तर परदेश प्रवासासाठी व्हिसासाठी अर्ज करताना आयटीआर फाइल करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. आयटीआर हे अनेक सरकारी योजना आणि अनुदानांसाठी आवश्यक कागदपत्र आहे. तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असला तरीही तुम्हाला आयकर विवरणपत्रे सादर करावी लागतील.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सांगली दर्पण माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.