चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागणार? HMPV विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने आणीबाणी जाहीर
चीन: चीनमध्ये HMPV (ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस) विषाणू अत्यंत वेगाने पसरत आहे. अनेक राज्यांमध्ये वाढत्या प्रादुर्भावामुळे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
हा विषाणू कोरोनापेक्षा अधिक धोकादायक असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. चीनमधील अनेक भागांत परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून, नागरिक मास्क वापरण्यास सुरुवात करत आहेत. हजारो लोक या विषाणूला बळी पडत असून, विशेषतः वृद्ध आणि लहान मुलांमध्ये संसर्गाची तीव्रता अधिक दिसून येत आहे.रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, बालवॉर्डमध्ये विशेषतः प्रचंड प्रमाणात रुग्ण भरले आहेत. रुग्णालयांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
चीनच्या उत्तर भागात HMPV विषाणूचा मोठा प्रसार झाला आहे. विमानतळांवरही गर्दी वाढली असून, अनेक राज्यांमध्ये संसर्गाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. व्हायरोलॉजी तज्ज्ञ डॉ. लिन जियाजू यांच्या मते, एचएमपीव्ही विषाणू पूर्वी सौम्य स्वरूपाचा होता, मात्र आता तो गंभीर प्रकरणांना कारणीभूत ठरत आहे. लोकांच्या प्रतिकारशक्तीमध्ये झालेली घट आणि विषाणूच्या उत्परिवर्तनामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. हा विषाणू चीनमधून इतर देशांमध्येही पसरत आहे. इंग्लंडमध्ये फ्लूचा झपाट्याने प्रसार होत असून, रुग्णालयांतील रुग्णसंख्या चौपट झाली आहे.
WHO ने विषाणूच्या उत्परिवर्तनावर लक्ष ठेवले असून, मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. सध्या जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर झालेली नाही, मात्र चीनमधील परिस्थिती पाहता शेजारील देशांमध्येही संसर्ग होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
HMPV विषाणू प्रथम 2001 मध्ये नेदरलँड्समध्ये ओळखला गेला. हा पॅरामिक्सोव्हिरिडे कुटुंबातील विषाणू असून, हिवाळ्यात त्याचा प्रसार अधिक होतो. खोकल्याने किंवा शिंकण्याने तो इतर लोकांपर्यंत पोहोचतो.
HMPV विषाणू आतापर्यंत चीनसह नेदरलँड, ब्रिटन, फिनलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आणि अमेरिका या देशांमध्ये आढळला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.