Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

HMPV Virus चा कहर! शाळा-कॉलेज बंद, WHO ने मागितला रिपोर्ट

HMPV Virus चा कहर! शाळा-कॉलेज बंद, WHO ने मागितला रिपोर्ट
 

एचएमपीव्ही व्हायरसमुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. अशातच आता चीनमध्ये एचएमपीव्ही व्हायरसमुळे परिस्थिती बिघडू लागली आहे. वुहानमध्ये शाळा बंद करण्यात आल्या आहेत. लहान मुलांमधील वाढता संसर्ग पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.

या व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे WHO देखील चिंतेत आहे. WHO ने चीनकडून HMPV ची संपूर्ण माहिती मागवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वुहानमध्ये गेल्या 10 दिवसांत HMPV विषाणूच्या प्रकरणांमध्ये 529% वाढ झाली आहे. 

 
भारतातही एचएमपीव्ही व्हायरसचा शिरकाव
एचएमपीव्ही विषाणू जगभरात वेगाने पसरत आहे. भारत, मलेशिया, जपान, कझाकस्तानमध्ये प्रकरणे वाढत आहेत. ब्रिटनमध्येही संसर्ग पसरत आहे. भारतातील 5 राज्यांमध्ये आतापर्यंत 8 प्रकरणे आढळून आली आहेत. महाराष्ट्रात 2 प्रकरणे आढळून आली आहेत. नागपुरात 13 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षाचा मुलगा संक्रमित आढळले आहेत. तसेच कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्येही रुग्ण आढळले आहेत. या विषाणूबाबत केंद्र सरकार सतर्क आहे.
केंद्र सरकार सतर्क 

केंद्र सरकारने राज्यांना इन्फ्लूएंझा सारख्या आजारावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. तसेच एचएमपीव्ही प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्याचा सल्ला दिला. केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सोमवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह डिजिटल बैठकीचे आयोजन केले होते, या बैठकीत आरोग्य सचिवांनी श्वसनाचे आजार, एचएमपीव्ही प्रकरणे आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी देशातील तयारीचा आढावा घेतला.

HMPV म्हणजे काय?
चीनसह अनेक देशांमध्ये नवीन ह्युमन मेटाप्युमोव्हायरस विषाणू असून त्याला HMPV म्हटले जात आहे. हा एक प्रकारचा सामान्य श्वसन विषाणू आहे जो सर्व वयोगटातील लोकांमध्ये पसरू शकतो. या विषाणूचा रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या वृद्ध आणि लहान मुलांवर जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे. या विषाणूची लागण संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने होऊ शकते.
काय आहेत HMPV ची लक्षणे?

प्रामुख्याने लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेले लोक एचएमपीव्ही विषाणूमुळे बाधित होत असल्याचे समोर आले आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार (CDC) HMPV शी संबंधित सामान्य लक्षणांमध्ये खोकला, घसा खवखवणे, नाक बंद होणे किंवा नाक वाहणे, श्वास घेण्यास त्रास होणे, डोकेदुखी, थकवा, थंडी वाजणे आणि ताप येणे यांचा समावेश आहे.

HMPV पासून सुरक्षित कसे राहावे?
HMPV विषाणूपासून स्वस्त:ला सुरक्षित ठेवण्यासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी मास्क घाला, कारण तो खोकला आणि सर्दीमुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो. हात वारंवार धुवा, संक्रमित व्यक्तीशी हस्तांदोलन करू नका आणि घरी परतल्यानंतर हात पूर्णपणे स्वच्छ करा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर द्या. सध्या एचएमपीव्ही विषाणूनवर कोणतीही लस उपलब्ध नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.