Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ED ची रेड अन् पायल मोदीने विष घेतलं, 5 पानांची चिठ्ठीत बड्या नेत्यांची नावं, 76 कोटींची प्रॉपर्टी

ED ची रेड अन् पायल मोदीने विष घेतलं, 5 पानांची चिठ्ठीत बड्या नेत्यांची नावं, 76 कोटींची प्रॉपर्टी
 

ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयने एका कंपनीवर छापेमारी केल्यानंतर संबंधित कंपनीच्या संचालिकेनं विष प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी ईडीने कंपनीच्या विविध ठिकाणांवर छापेमारी केली होती. यानंतर ईडीने कंपनीची मालमत्ता देखील जप्त केली होती. या कारवाईनंतर कंपनीच्या 31 वर्षीय संचालिकेनं थेट विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ईडीच्या छापेमारीनंतर दुसऱ्याच दिवशी एका बड्या कंपनीच्या संचालिकेनं अशाप्रकारे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने उद्योगजगतात खळबळ उडाली आहे. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.


पायल मोदी असं विष प्राशन करणाऱ्या महिलेचं नाव आहे. त्या मध्य प्रदेशातील भोपाळ येथील जयश्री गायत्री फूड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका आहेत. पायल मोदी यांचे पती किशन मोदी हे या कंपनीचे मालक आहेत. बुधवारी ईडीने भोपाळ, सेहोर आणि मुरैना जिल्ह्यातील जयश्री गायत्री फूड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. या छापेमारीनंतर पायल मोदी यांनी अटकेच्या भीतीपोटी विष प्राशन केल्याचं सांगितलं जातंय. भोपाळमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बुधवारी केलेल्या छापेमारीत ईडीला विविध कंपन्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावावर ६६ कोटी रुपयांची बेहेशोबी मालमत्ता आढळली. शिवाय पायल मोदी यांच्या कुटुंबाकडे 25 लाख रुपये रोख रक्कम, बीएमडब्ल्यू आणि फॉर्च्यूनर सारख्या आलिशान कारही सापडल्या आहे. या गाड्या ईडीने जप्त केल्या आहे. याशिवाय, ईडीने कुटुंबाच्या एफडीचे 6.26 कोटी रुपये देखील गोठवले आहेत.
ईडीने दावा केला की, जयश्री गायत्री फूड्स प्रायव्हेट लिमिटेडकडून विविध बनावट प्रमाणपत्रांचा वापर भेसळयुक्त दूध उत्पादने निर्यात करण्यासाठी केली जात होती. तसेच ही प्रमाणपत्रे मूळतः इतर कंपन्यांना जारी करण्यात आली होती किंवा ती फसवणूक करून मिळवण्यात आली होती. ईडीने किशन मोदी यांच्या विविध कंपन्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावे असलेल्या 66 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेचे कागदपत्रे आणि इतर कागदपत्रेही जप्त केली आहेत.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.