Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वाल्मिक कराडच्या संपत्तीचा आकडा पाहून ED थक्क, आकड्यात सांगायचं झालं तर 1500,000,00,00,000

वाल्मिक कराडच्या संपत्तीचा आकडा पाहून ED थक्क, आकड्यात सांगायचं झालं तर 1500,000,00,00,000
 

बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी मानले जाणारे वाल्मिक कराड यांना यांना सीआयडीने अटक केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसपींची बदली केल्यानंतर पोलिस तत्परतेने काम करत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मसजोग गावच्या सरपंचाच्या हत्येप्रकरणी संतोष देशमुख वाल्मिक कराड यांचे नाव घेतले जात आहे. दुपारी तीनच्या सुमारास एका स्कॉर्पिओतील सहा जणांनी त्यांना अडवून जबरदस्तीने पळवून नेले. त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला. देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली. यानंतरच राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी विरोधक करत आहेत. वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचा आरोप आहे. दरम्यान वाल्मिक कराडला यापूर्वीच सक्तवसुली संचलनालयाकडून म्हणजेच ईडीकडून नोटीस आली होती. वाल्मिक कराडने जमवलेल्या संपत्तीचा आकडा पाहून ईडीच्या अधिकारीही थक्क झाल्याची चर्चा आहे.

वाल्मिक कराड हे परळी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष असून मंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. गेल्या दहा वर्षांपासून ते परळी मतदारसंघाचे राजकीय व्यवस्थापन सांभाळत आहेत. धनंजय मुंडे यांनी राजकारण सुरू केल्यापासून वाल्मिक कराड सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत आहेत. कराड जिल्ह्याच्या सर्व शासकीय व सामाजिक कार्यक्रमांवर देखरेख करतात. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना अशाच पद्धतीने जिल्ह्याचा कारभार चालवत असत. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना त्यांच्या मनात एक आकर्षण होते. विशेष म्हणजे वाल्मिक कराडवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आहेत. ते तिसऱ्यांदा मंत्री झाले आहेत. यावेळी त्यांना अन्न पुरवठा विभाग मिळाला आहे.

एका वृत्तवाहिणीच्या कार्यक्रमात दिलेल्या विशेष मुलाखतीत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंच्या राजकारणावर भाष्य केले. धनंजय मुंडेंनी वाळुतून पैसा, राखेतून पैसा कमावला असून घरकुलांसाठी त्यांनी 10-10 हजारांची वसुली केल्याचा आरोप आहे. या मुलाखतीत त्यांनी वाल्मिकने 1500 कोटींची संपत्ती मिळवल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. या संपत्तीच्या चौकशीसाठी ईडीने दोन महिन्यांपूर्वी वाल्मिकला यांना नोटीस बजावली आहे. म्हणजेच आकडेवारीनुसार वाल्मिक कराडची संपत्ती 1500,00,00,00,000 रुपये आहे. 

मात्र आमदार धस यांनी वाल्मिक कराडच्या संपत्तीबद्दल केलेल्या दाव्यासंदर्भात खासदार बजरंग सोनावणे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बजरंग सोनावणे म्हणाले की, "सुरेश धस हे पाचव्या टर्मचे आमदार आहेत, त्यामुळे ते अभ्यास करून बोलणारे नेते आहेत. तसेच त्यांच्याकडे काहीतरी पुरावा असेल तेव्हाच ते बोलले असतील. त्यामुळे आता शासनाने आणि पोलीस यंत्रणेने त्या गोष्टी तपासला पाहिजे" असं बजरंग सोनावणे म्हणाले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.